घोसरवाड : धर्मवीर छत्रपती शंभूराजे मंडळाचा कायमस्वरूपी डॉल्बी मुक्त गणेशोत्सवाचा आदर्श निर्णय

बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील घोसरवाडचा महाराजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या धर्मवीर छत्रपती शंभूराजे मंडळाने यावर्षीपासून कायमस्वरूपी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक, पारंपरिक तसेच सामाजिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प या मंडळाने केला असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धर्मवीर छत्रपती शंभूराजे मंडळ गेली अनेक वर्षे अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करत आहे. आकर्षक स्टेज सजावट, विविध प्रकारची रोषणाई आणि धार्मिक कार्यक्रम यामुळे भाविकांची मने त्यांनी जिंकली आहेत. यावर्षी देखील मंडळाने धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.

मंडळाच्या या निर्णयामुळे परिसरात आदर्श निर्माण झाला असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. “कुरुंदवाड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक  रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला, असे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष शितल पुजारी यांनी सांगितले.

या प्रसंगी मंडळाचे प्रमुख व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष शितल पुजारी, सुशांत कोकणे, अमोल नरदे, रोहित कोकणे, जयसिंग शिंदे तसेच मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष