पुरामुळे शिरोळ तालुक्यात "हे" मार्ग बंद
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या आठवड्यात घरापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील प्रमुख मार्ग व तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना केल्या असून नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
या मार्गावरील वाहतूक बंद
हेरवाड - अब्दुललाट
नांदणी - कुरुंदवाड
शिरढोण - नांदणी
शिरोळ - नांदणी
कुरुंदवाड - शिरोळ बंधारा
तेरवाड बंधारा
राजापूर बंधारा
कनवाड - म्हैशाळ बंधारा
कोथळी - समडोळी बंधारा
दत्तवाड - मलिकवाड बंधारा
दतवाड - एकसंबा बंधारा
घोसरवाड - सदलगा बंधारा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा