कोयना,वारणा,राधानगरीतुन विसर्ग झाला अतिशय कमी
अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
गेले दोन दिवस जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रात पावसाने उसंत घेतल्याने कोयना,वारणा,राधानगरी धरणातील मोठ्या प्रमाणात सुरु असलेला विसर्ग गुरुवारपासुन अतिशय कमी करण्यात आला आहे.
यामुळे शुक्रवारपासुन जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यातील विविध नद्यांच्या पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात होईल.परिणामी तालुक्यातील गंभीर होत असलेला पुराचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.
गेले दोन दिवस जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रातही पावसाने चांगलीच उसंत घेतली आहे. पाऊस कमी झाल्याने धरणसाठ्यात होणारी आवक कमी झाली आहे.परिणामी धरणातुन करण्यात येत असलेला मोठ्या प्रमाणातील विसर्ग गुरुवारी सकाळपासुन अतिशय कमी कमी करीत आणण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी ८ वाजता कोयना धरणातुन एकुण ८२,१०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु होता.यामध्ये दिवसभरात विसर्ग कमी करीत करीत तो रात्री नऊ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेचार फुटावरुन तीन फुटापर्यंत खाली आणण्यात आले आहेत.यातुन आता एकुण २१,९०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. तर वारणा धरणातुनही सकाळी आठ वाजता सुरु असलेला एकुण १५,३६९ क्युसेक विसर्ग दिवसभरात कमी करुन तो रात्री नऊ वाजेपर्यंत मात्र ७३११ क्युसेकवर आणण्यात आला आहे.राधानगरी धरणातुन सकाळी आठ वाजता एकुण ४३५६ क्युसेक विसर्ग सुरु होता. यामध्ये दिवसभरात काही स्वंयचलित दरवाजे बंद होत गेल्याने सांयकाळी पाच वाजेपर्यंत मात्र एकुण २९२८ विसर्ग नदीपात्रात सुरु राहीला आहे.
दरम्यान अलमट्टी धरणातुनही पुढे कर्नाटकात एकुण २,५०,००० क्युसेकने विसर्ग सुरु आहे.तसेच
कोयना,वारणा,राधानगरी धरणातुनही विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्यामुळे जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यातील पुरपरिस्तिथीत शुक्रवारपासुन चांगलीच सुधारणा होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा