अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अतिथी गृहात लोकनेते महामानव अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती व समस्त मातंग कुरुंदवाडतर्फे करण्यात आली आहे.
दरम्यान मागणीचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांना देण्यात आले आहे.
नमूद करण्यात आले आहे की, कुरुंदवाड येथे शिवतीर्थालगतच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अतिथिगृह आहे,या अतिथी गृहाच्या समोर प्रशस्त अशी बाग आहे त्या ठिकाणी कारंजा आहे, या बागेतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा आमच्या मागणीची पूर्तता लवकर पूर्ण करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा ही दिला आहे.
निवेदनावर शाहीर आवळे, बाबासो आवळे, रामदास आवळे, प्रशांत कांबळे, राजू आवळे, राजाराम भंडारे,सुरेश ठोंबरे,सागर आवळे, अमर आवळे, सुभाष आवळे, बाळू भंडारे आदींच्या सह्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा