आदर्श सोसायटी लि. सदलगा या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत संपन्न

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 चिकोडी तालुक्यातील अल्पावधीमध्ये जनसामान्यात नावारूपाला आलेली आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ओम मल्टीपर्पज हॉल येथे मोठ्या उत्साहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाहुबली कलाजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 

 व्यासविठावरील मान्यवरच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले,

 स्वागत व प्रास्ताविक भाषणात संस्थेचे संस्थापक बाहुबली कलाजे यांनी आपल्या संस्थेने या सात वर्षांमध्ये चार शाखांचा इतर खेड्यामध्ये विस्तार करून आपल्या आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटी मार्फत दुग्ध व्यवसाय, शेती व्यवसाय, वाहन खरेदी,शेड बांधकाम, हातमाग, कुक्कुटपालन, लघु विक्रेते अशा समाजातील सर्वसामान्य घटकांना आर्थिक मदतीचा हात देऊन समाजातील सामाजिक बांधिलकी जोपासून नवा आदर्श या आदर्श को-ऑपरेटिव्ह बँकेने केला असल्याचे त्यांनी सांगितले. 

आपल्या बँकेमार्फत सभासदांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी पाच हजार रुपये त्याचबरोबर महिला सबलीकरणासाठी महिला बँकेची स्थापना अशा अनेक योजना आपण येत्या काळात राबवणार असल्याची त्यांनी सांगितले. 

            संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अमोल पाटील यांनी संस्थेच्या अहवालातून संस्थेने केलेल्या कार्याचा तपशील वाचून दाखवला आणि संस्थेची प्रगती विकासाच्या दिशेने चालू असल्याचे त्यांनी नमूद केले.

 संस्थेचे सचिव संतोष मडिवाळ यांनी संस्थेचा अहवाल वाचून संस्थेला आर्थिक वर्ष सन 2024 -2025 मध्ये निव्वळ नफा 21 लाख 20 हजार इतका झाला असून संस्थेने यावर्षी सभासदांना 20 टक्के लाभांश वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले. अहवाल चालत वर्षाची सदस्य संख्या 1085 असून भाग भांडवल 15 लाख 39 हजार 500 इतकी आहे तर निधी 91 लाख 31 हजार इतकी आहे ,आजवरच्या संस्थेच्या पार पारदर्शक कारभार विश्वास ठेवून सभासद,ठेवीदारांनी अहवाला अखेर संस्थेत 25 कोटी 08 लाख 44 हजार 481 इतकी ठेव जमा आहे, तर विविध बँकांमध्ये संस्थेने 6 कोटी 9 लाख 40 हजार 419 इतकी शिल्लक ठेवली आहे .विविध संघ संस्था मध्ये संस्थेने 17 लाख 200 रुपये इतकी गुंतवणूक केली आहे, अहवाल सालात संस्थेकडून 19 कोटी 59 लाख 10 हजार 672 इतके सभासदसह, व्यवसायिकांना कर्ज वितरण केले आहे. 

 यावेळी संस्थेमार्फत समाजातील 15 सन्माननीय व्यक्तींचा, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

या वार्षिक सर्वसाधारण वेळी हाल शुगर चे संचालक श्री शरद जंगठे,आदर्श को आप सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष श्री बाहुबली कलाजे, संचालक अमोल पाटील,रामू कलाजे, बाळगोंडा पाटील, नितीन सपकाळे, श्रीकांत कलाजे, रावसाहेब पाटील, भरतेस उदगावे संभाजी डांगे, संजय पाटील बोरगावकर, अनुराग दीक्षित,दस्तगीर अपराज, पूजा गिडगले, मंगल करगावे मोहन नाईक, संतोष मडीवाल सह सदलगा, बंबलवाड, मुगळी, चिंचणी, पट्टणकुडी, या शाखेचे संचालक मंडळ व सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष