नशामुक्त युवक देशाचा खरी ताकद : पोलीस निरीक्षक एम.एस. शेख

 निगवे खालसा येथे इस्पूर्ली पोलीस स्टेशन तर्फे नशा मुक्त अभियान व मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 



कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

समाजातील तरुणाई व काही नागरिक मोबाईलच्या रिल्स ,सोशल मीडिया आणि ड्रग्सच्या विळाख्यात सापडली आहे. व्यसनामुळे नागरिकांच्या आरोग्यच सोबतच त्याचे व संपूर्ण कुटूंब उध्वस्त होते. नशेचा परिणाम व्यक्तीच्या शैक्षणिक , सामाजिक व आर्थिक स्तरावर होऊन तो दिशाहीन होतो.त्यामुळे तरुणाईने व्यसनाच्या आहारी न जाता बलशाही भारत घडवण्यासाठी नशा मुक्त तरुण ही राष्ट्राची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन इस्पुर्ली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम. एस. शेख यांनी व्यक्त केले . निगवे खालसा(ता.करवीर ) येथे कोल्हापूर पोलीस दल व इस्पुर्ली पोलीस स्टेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या नशा मुक्त अभियान व मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार व करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री सुजितकुमार क्षीरसागर यांच्या सूचनानुसार सदरचा मॅरेथॉन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती कांबळे होत्या . 

पुढे बोलताना श्री शेख , म्हणाले नशेच व्यसन व गुन्हेगारी यांचा थेट संबंध असल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. नशा करून क्षणिक सुख मिळते. पण कष्ट करून चिरकाल टिकणारा आनंद व शाश्वत यश मिळते . त्यामुळे तरुणाईने नशेच्या आहारी न जाता चांगल्या सवयी लावून घेऊन आपला व आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास करावा.

नशा मुक्त अभियाना अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ३०० हून अधिक युवक व युवतींनी पाच किलोमीटरच्या अंतर धावत स्पर्धा यशस्वी पूर्ण केली. सदर कार्यक्रमास इस पुरली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गुरव नलावडे सहाय्यक फौजदार मेटिल व व इतर पोलीस हजर होते. कार्यक्रमाला बिद्री कारखान्याचे संचालक आर एस. कांबळे, गुरुदत्त शुगर्स चे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले, पं.स.चे माजी उपसभापती सागर पाटील ,उपसरपंच अशोक किल्लेदार ,ग्रा.प सदस्य बाबुराव पाटील,संभाजी किल्लेदार , शिवाजी पाटील संतोष किल्लेदार , अमित पाटील ,वस्ताद ग्रुपचे अध्यक्ष सागर कोपर्डेकर, दीपक सोनाळकर, तुषार पाटील ,संदीप पाटील ,इस्पूर्ली पोलीस स्टेशनची कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक डी.व्ही.किल्लेदार (सर ) यांनी केले.


*फोटो लाईन -*

निगवे खालसा : कोल्हापूर पोलीस दल व इस्पुर्ली पोलीस स्टेशन यांच्या वतीने नशा मुक्त अभियान अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात करताना पोलीस निरीक्षक एम.एस. शेख व इतर मान्यवर .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष