११०० झोपडपट्टीधारकांना येत्या वर्षभरात हक्काचे घर मिळवून देणार : आमदार यड्रावकर

  राजीव गांधीनगर भागातील झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

राजर्षी शाहू महाराजांनी व्यापारी पेठ म्हणून जयसिंगपूर बसवल्यानंतर अनेक कुटुंबं रोजगारानिमित्त येथे स्थायिक झाली, पण त्यांना कायदेशीर घराचा हक्क मिळाला नाही. अनेक नेत्यांनी केवळ आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात समस्या सोडवली गेली नाही.

जयसिंगपूर शहराच्या विकासात झोपडपट्टी धारकांचा मोठा वाटा आहे. गेल्या ५० वर्षापासून हक्काच्या घरासाठी प्रयत्न सुरू होते आज त्या प्रयत्नांना यश आले आहे. पहिल्या टप्प्यात ६४ जणांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत आहे यापुढेही या परिसरातील ११०० झोपडपट्टी धारकांना येत्या वर्षभरात हक्काचे घर मिळवून देणार आहे, अशी स्पष्ट ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. 

जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर मधील ६१ झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. 

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात मुख्याधिकारी टीना गवळी यांनी नगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करून सर्व झोपडपट्टी धारकांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्याचे अभिवाचन दिले.

यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, राजीव गांधी नगर भागातील झोपडपट्टी धारकांची मुले आज उच्च शिक्षण घेत आहेत. तसेच तरुणांना रोजगार व व्यवसायात प्रगती करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. ज्या ' ज्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड निघाले आहेत ज्यांची घरे जिर्ण झाले आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी नगरपालिका प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. येणाऱ्या काळात या परिसरातील सर्वच झोपडपट्टी धारकांनी आपली कागदपत्रे नगरपालिकेत जमा करावी जेणेकरून एक ही नागरिक आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही. कागदपत्रांसाठी काही अडथळे निर्माण झाली तर थेट माझ्याशी संपर्क साधा त्यातून मार्ग काढला जाईल. यापुढेही झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन असे सांगितले.

माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, राजीव गांधी नगर झोपडपट्टीतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा आजचा दिवस हा जयसिंगपूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा, असा आहे. गेली पन्नास वर्षे नागरिकांना केवळ आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात घराचा कायदेशीर हक्क मिळाला नव्हता. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले. अवचित नगर झोपडपट्टी येथे झोपडपट्टी नियमित करून पहिला प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रम यशस्वी झाला. त्याच धर्तीवर आता राजीव गांधी नगरात ही प्रक्रिया सुरू आहे.

आज पहिल्या टप्प्यात ६४ नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले असून, प्रत्येकाच्या नावावर २५ ते ३० लाखांच्या मूल्याची मालमत्ता नोंदवली जात आहे. पुढील काही महिन्यांत उर्वरित घरांनाही टप्प्याटप्प्याने प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. 

यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील, यड्रावकर मुख्याधिकारी टीना गवळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड चे वाटप करण्यात आले. यावेळी झोपडपट्टी वासियांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी बाळासो वगरे, मुक्ताबाई वगरे, फुलाबाई बेडगे, संभाजी मोरे, जोतिराम जाधव, प्रकाश पवार, नेताजी सावंत, दादासो पाटील चिंचवाडकर, राहुल बंडगर, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, फुलाबाई बेडगे, असलम फरास, रघुनाथ देशिंगे, पराग पाटील, महेश कलकुटगी, रघुनाथ देशिंगे, अजित पाटोळे, इब्राहिम बागवान, सुनील पाटील, कोंडीबा खरात, सतीश माळी, अविनाश कोटकप्पे, सुनील बंडगर, फारुख कडबी यांच्यासह पदाधिकारी व राजीव गांधी नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष