पाणी पातळीत मोठी घट होणार : कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद

अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

गेले दोन दिवस जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रात पावसाने पुर्ण विश्रांती घेतली आहे.यामुळे कोयना धरणसाठ्यात पाण्याची आवक अतिशय कमी झाली आहे.परिणामी आज शुक्रवारी रात्री आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटावरुन पुर्णपणे बंद करण्यात आले आहेत.यातुन सुरु असलेला १०,००० क्युसेक विसर्ग कमी होवुन मात्र धरणपायथा विद्युत गृहातुन २१०० क्युसेक एवढाच विसर्ग आता नदीपात्रात करण्यात येत आहे.

  वारणा धरणातुनही विसर्ग पुर्णतः बंद असुन यातुन विद्युतगृहातील १६३० क्युसेक एवढाच विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.

 कोयनेसह वारणा धरणातुन करण्यात येणारा विसर्ग पुर्णतः बंद झाल्याने शिरोळ तालुक्यातील गंभीर पुरपरिस्थिती उद्या शनिवार सकाळपासुन ओसरण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष