बावडा- शिये रस्त्यावर पुराचे पाणी ; रेल्वे परिक्षार्थीचे हाल
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापुर जवळील शिये येथील टीसीएस आयआँन डिजीटल झोन केंद्रात आज गुरुवारी रेल्वे भर्ती बोर्डाच्या एनटीपीसी पुर्व स्नातक स्तरावरील संगणकावर आधारीत परिक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या परिक्षा तीन शिफ्टमध्ये आहेत. सकाळी साडेसात,सव्वा अकरा व दुपारी तीन वाजता अशा होणार आहेत.
यासाठी जिल्ह्यासह रत्नागिरी भागातील हजारो विद्यार्थ्यांना शिये येथील केंद्रावर यावे लागणार आहे.
मात्र आज गुरुवारी सकाळी बावडा ते शिये मार्गावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा रस्ता बंद झाला आहे हे अनेक पालक,विद्यार्थ्याना माहीत झाले नाही.यामुळे कोल्हापुरहुन,रत्नागिरीहुन बावडा मार्गे शिये कडे येणार्या सर्वांचेच हाल झाले.जे चार चाकीने आले होते त्यांना परत तावडे हाॅटेल,हायवे वरुन जवळपास पंचवीस तीस किलोमिटरचा फेरा मारुन शिये केद्रांजवळ यावे लागले.तर जे दूचाकीने आले होते त्यांनी रस्त्यावरच आपली वाहने लावुन जवळपास पाच किलोमिटर रस्त्यावरील पाण्यातुन चालत आले. यामुळे बर्याच विद्यार्थ्याना परिक्षेसाठी वेळेत येण्यास विलंब झाला.
धरणातुन सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोल्हापुरातील बर्याच रस्त्यावर पाणी आले आहे.यामुळे शिये येथे रेल्वेच्या परिक्षेसाठी येणार्या विद्यार्थ्यानी कोणता रस्ता सोयीस्कर होईल.याची खातरजमा,चौकशी करुन मगच परीक्षेसाठी यावे.जेणेकरुन सर्वांना वेळेत पोहचता येईल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा