कोयनेचे दरवाजे १३ फुटापर्यंत उचलले.वारणेतुन विसर्ग वाढविला
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
धरणपाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने कोयना व वारणा धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी रात्री आठ वाजता दोन्ही धरणातुन विसर्ग वाढविण्यात आला आहे.
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे मंगळवारी रात्री आठ वाजता १२ फुटावरुन १३ फुटापर्यंत वर उचलले आहेत. यातुन ९३,२०० क्युसेक व धरण विद्युत पायथागृहातुन २१०० क्युसेक असा एकुण ९५,३०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे.
वारणा धरणपाणलोटक्षेत्रातही पाऊस वाढल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी रात्री आठ वाजता विसर्ग वाढविण्यात आला आहे.
वारणा धरणातुन सांयकाळी सुरु असलेल्या ३४,७३२ क्युसेक विसर्गामध्ये रात्री आठ वाजता वाढ करुन तो एकुण ४०,००० क्युसेक करण्यात आला आहे.
धरणपाणलोटक्षेत्रात पाऊस वाढल्यास विसर्गामध्ये आणखु वाढ करण्याचे संकेत धरण प्रशासनाने दिले आहेत.
धरणातुन करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील नंद्याच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे.यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान अलमट्टी धरणातुन १,७५,००० क्युसेकने विसर्ग करण्यात येत असल्याने शिरोळ तालुक्यातील संभाव्य पुरापासुन दिलासा मिळु शकतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा