कृष्णेच्या पातळीत सहा फुटाने घट

अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पातळीत सोमवारी २४ तासात सहा फुटाने घट झाली आहे.

शिरोळ तालूक्यासह वारणा धरणपाणलोटक्षेत्रात पावसाने पुर्ण उघडीप दिली आहे.यामुळे रविवारपासुन वारणा धरणाच्या वक्र दरवाज्यातुन सुरु असलेला ३१९३ क्युसेक विसर्ग सोमवारी दुपारी अडीच वाजल्यापासुन बंद करण्यात आला आहे. मात्र धरणाच्या विद्युत गृहातुन १६३० क्युसेक विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे.तसेच राधानगरी धरण पायथा विद्युतगृहातुन १५०० क्युसेक सुरु आहे.

शिरोळ तालुक्यातील पुर ओसरत असतानाच सोमवार दुपारपासुन कोयना धरणातुन विसर्ग वाढविण्यात आला आहे . कोयना धरणात पाण्याची आवक वाढत आहे.यामुळे सोमवारी दुपारी ४ वाजल्यापासुन धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फुटावरुन २ फुटावर नेण्यात आले आहेत.यातुन एकुण १८,९०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे.यामुळे सद्य पुरस्थितीत नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते.परिणामी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  शिरोळ तालुक्यात पुर ओसरत असला तरी अजुनही नद्यांचे पाणी पात्राबाहेरुनच वाहत आहे. शेत शिवारात शिरलेले पाणी हळुहळु कमी होत आहे.काही गावात रस्त्यावर,पुलावर आलेले पाणी ओसरुन वाहतुकीसाठी खुले होत आहेत.तर महत्वाचे रस्ते,पुल अजुनही पाण्याखाली आहेत.अशाचवेळी कोयना धरणातुन पुन्हा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत पुन्हा अंशी वाढ होणार आहे.यामुळे पुरस्थिती जैसे थे राहु शकते.तर नदीकाठावरील शेतशिवारात शिरलेले पाणी आणखी काही दिवस तसेच राहु शकते.यामुळे अतिपाण्यामुळे यातील विविध पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

 दरम्यान नृसिंहवाडीजवळ रविवारी सांयकाळी पाच वाजता पाणीपातळी ५७ फुट ८ इंच होती.ती सोमवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंत ५१ फुटावर ८ इंचावर आली आहे.यानुसार पाणी पातळीत सहा फुटाने घट झाल्याचे दिसुन येते.राजापुर धरणाजवळ रविवारी सांयकाळी पाणी पातळी ४६ फुट ६ इंच होती,ती सोमवारी सांयकाळी ४१ फुटावर आली आहे.

सोमवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात १०१.१४ टीएमसी,वारणा धरणात ३१.९९ टीएमसी, राधानगरी धरणात ८.१९ टीएमसी,तर अलमट्टी धरणात ११५.३८३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अलमट्टीतुन १,५०,००० क्युसेकने विसर्ग कर्नाटकात करण्यात येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष