अकिवाट – मजरेवाडी मार्ग वाहतुकीसाठी बंद
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे नदी–नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रातून होत असलेल्या विसर्गामुळे पाण्याचा प्रवाह आणखी वाढून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून काही मार्ग बंद करण्यात आले आहेत.
अकिवाट – मजरेवाडी या महत्त्वाच्या मार्गावर आज रात्री पाणी आल्याने तो मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस व प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सध्या या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा