दिलासादायक ...कोयना,वारणा,राधानगरीतुन विसर्ग झाला कमी
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
जिल्ह्यासह धरणपाणलोटक्षेत्रात कालपासुन पावसाने काही अंशी उसंत घेतली आहे.यामुळे कोयना,वारणा,राधानगरीतुन होणारा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे.
विसर्ग कमी झाला असला तरी शिरोळ तालुक्यातील कृष्णा - पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढच होत आहे.
कृष्णेच्या पाणी पातळीत रात्रीतुन चार फुटाने वाढ झाली आहे.यामुळे तालुक्यातील बहुतांशी मार्गावर पाणी येत असल्याने अनेक गावांचा एकमेकाशी संपर्क तुटत आहे.
तालुक्यात कृष्णेचे पाणी आता शेतशिवार ,ओढे,नाले पार करुन गावभागात शिरले आहे.यामुळे नदीकाठावरील रहीवाश्यांना स्थंलातर करावे लागत आहे.
दरम्यान कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सकाळी ६ वाजता १३ फुटावरुन ११ फुटापर्यंत खाली आणण्यात आले आहेत.यामुळे यातुन सुरु असलेला एकुण ९५,३०० क्युसेक विसर्ग कमी करुन तो ८२,१०० क्युसेक करण्यात आला आहे.वारणा धरणातुनही आज सकाळी ७ वाजता सुरु असलेला एकुण २२,४६० विसर्ग कमी करुन तो एकुण १५,३६९ क्युसेक करण्यात आला आहे. तर राधानगरी धरणातुन ४३५६ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.
अलमट्टी धरणातुन एकुण अडीच लाखाने विसर्ग पुढे कर्नाटकात सोडण्यात येत आहे.
कालपासुन बहुतांशी ठिकाणी पावसाने घेतलेली उसंत,विविध धरणातुन कमी करण्यात विसर्ग,अलमट्टीतुन वाढविण्यात आलेला विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील पुरपरिस्थिती आज सांयकाळपासुन काही प्रमाणात निवळण्यास सुरुवात होईल अशी आशा आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा