भारतमाता विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीराला मोठा प्रतिसाद
चिकुर्डे / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील भारत माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिकुर्डे येथे lराष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनाअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर यांच्यावतीने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. महेश बाबर यांनी विद्यार्थ्यांना शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध कडधान्ये, फळे, डाळी, भाजीपाला असा सर्वसमावेशक आहार घ्यावा असे आवाहन केले.
वैद्यकीय टीम मार्फत विद्यार्थ्यांची उंची, वजन, डोळे, कान, त्वचा यांची तपासणी करण्यात आली. तसेच आहार, स्वच्छता आणि लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टरांनी लहानसहान आरोग्य समस्या असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य सल्ला व उपचार दिले..
त्याचबरोबर तात्यासाहेब कोरे महाविद्यालय व संशोधन केंद्र नवे पारगाव यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत चिकित्सा शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांना दाताची काळजी घेण्याची आवाहन करून तपासणी करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. धनश्री पाटील,डॉ. माधुरी पायमल सर्व टीम तात्यासाहेब कोरे महाविद्यालयाच्या डॉ. समृद्धी देसाई, मनस्वी कदम, यश इंगळे शर्वरी जिरंगे यांची टीम, मुख्याध्यापक डी.बी सरगर, पर्यवेक्षक विश्वास पाटील, शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा