शिरटीत पश्चिम गावठाण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज भव्य महाप्रसाद
शिरटी / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरटी, तालुका शिरोळ येथील पश्चिम महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात. यावर्षीच्या गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त आज रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी जैन संस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी सात वाजता महिला- भगिनींसाठी ऑर्केस्ट्रा वैभव हा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, दत्त समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम, युवा नेते पृथ्वीराज यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे हे उपस्थिती राहणार असून लावणी सम्राट ज्योती यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन पश्चिम गावठाण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रवीण उदगावे उपाध्यक्ष प्रज्वल चौगुले खजिनदार प्रतीक पाटील आदिनाथ पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा