हरोली चांगल्या विचारांचे आदर्श गाव : जिल्हाधिकारी येडगे
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
हरोली हे चांगल्या विचारांचे आदर्श व उपक्रमशील गाव असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले हरोली (ता शिरोळ) येथील रौप्य महोत्सवी अजिंक्यतारा तरुण मंडळाने ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या अजिंक्यतारा अभ्यासिका केंद्राच्या उद्द्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
अजिंक्यतारा मंडळाने अद्यावत असे अभ्यासिका निर्माण केले आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी अभ्यासाकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या अभ्यासिका केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितपणे हे अभ्यासिका केंद्र मार्गदर्शक ठरेल. या केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी येडगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलताना पुढे म्हणाले, अजिंक्यतारा मंडळाने सुरु केलेला हा आदर्शवत उपक्रम असून असे उपक्रम संपूर्ण राज्यात राबवले जावेत.हरोली गाव नेहमीच सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिले असून जिल्हयात पहिला सोलर प्लॅंट उभा करण्याचा मान देखील या गावानेच मिळवला आहे. गायरान जमिन ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने दयावा त्यावर नक्कीच विचार करु असे त्यांनी संगितले. गणपतीबाप्पाचे स्वागत आनंदाने करावे, आरोग्याला हानिकारक डॉल्बीचा वापर टाळावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिरोळचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर व संतोष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संतोष कदम यांनी हरोली गाव विधायक कामाला प्राधान्य देणारे गाव असून भविष्यात अजिंक्यतारा अभ्यासिकेत १०० विद्यार्थी शिकावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
अजिंक्यतारा मंडळाने नेहमीच वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छता, महिला सक्षमीकरण, वृध्दाश्रम अनाथाश्रमांना सहाय्य, रक्तदान याबरोबरच विविध उपक्रमाबरोबरच सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २० विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज, अत्याधुनिक अभ्यासिका केंद्राचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी तलाठी एकनाथ पाटील, सरपंच तानाजी माने, उपसरपंच जंबूकुमार चौगुले, पोलिस पाटील सौ. सुषमा माळी, भरतकुमार चौगुले, नेमिनाथ चौगुले, संग्राज भोसले, भीमगोंडा पाटील, वसंत कदम, राजगोंडा पाटील, अमित मगदूम, विजय उपाध्ये याबरोबरच गावातील फौजी ,माता भगिनी
व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक अमर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिता चौगुले यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा