बोरगाव सह परिसरात गौरीचे सोन पावलांनी उत्सहात आगमन
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
संपूर्ण देशात श्री गणेश चतुर्थी हा सण मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात येतो.गणेश मूर्ती प्रतिष्ठापना नंतर गौरी आगमन व स्थापना ला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. बोरगाव सह परिसरात रविवारी दुपारी गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळ पासूनच गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजून, डोल हलगी-ताशांच्या गजरात गौरींचे उत्साह पूर्वक स्वागत केले. घराघरात पूजा-अर्चा, फुलांची सजावट, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी वातावरण भारावून गेले. गौरी पूजनानिमित्त महिलांनी गाणी, झिम्मा फुगडी खेळत ओव्या म्हणत पूजा केली. खास करून लहान मुली व तरुणींनी या पारंपरिक सणात उत्साहाने सहभाग घेतला. *. महिलांनी गौरी सण सजावटीसाठी लागणारे साहित्य, फुले व पूजेच्या वस्तूंची खरेदी - जोरात झाली होती. घराघरात विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थांचे आयोजन करण्यात आले. यामुळे गावात ऐक्य व सौहार्दाची भावना दृढ होताना दिसली.
बोरगांव येथील काही मंडळांतर्फे सामूहिक गौरी पूजनाचे आयोजन करून महिला व बालिकांना एकत्र येऊन पारंपरिक खेळ व कार्यक्रम राबविण्यात आले. गणेशोत्सवाच्या उत्साहात भर घालत गौरींचे आगमन झाल्याने बोरगाव व परिसर सणाच्या आनंदात बहरून गेला आहे.
गौरीची स्थापना नंतर आज महिलांचा गवर खेळण्यात मोठा सहभाग घेतला जात असून या मध्ये फुगडी खेळणे,गौरीची गाणी ओव्या सादर केली जातात. एकंदर गौरी सण म्हणजे महिलांच्या जीवनातील एक आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा