अध्यात्मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून आयबीआर अचीव्हर पुरस्कार प्रदान
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील प्रमोद गुंडू सदलगे यांचा केवळ एक वर्ष नऊ महिने (पावणेदोन वर्षे) वयाच्या "चि. अध्यात्म" या मुलग्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स् या संस्थेकडून आय बी आर अचीव्हर या विशेष उल्लेखनीय प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात आले. अवघ्या पावणेदोन वर्षाच्या बालकाच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.
अध्यात्मने अवघ्या पावणेदोन वर्षाच्या वयात १८ प्राण्यांची नांवे, ६ समुद्री प्राण्यांची नांवे, १० नेत्यांची नांवे, १० वाहनांची नांवे, ६ भाज्या, ६ फळे, १० संसारोपयोगी वस्तू, ८ पक्षी, ६ ऐतिहासिक स्थळे, ८ मानवी शरीराचे अवयव, ८ चांगल्या सवयी , ६ कीटक, ५ राष्ट्रीय प्रतीके (सिंबॉल) यांची नांवे आणि कन्नड आणि इंग्लिश मुळाक्षरांचे पाठांतर अशा सर्व चाचण्यात लीलया उत्तरे देऊन यश संपादन केले. यामागे अध्यात्मच्या आईची सौ.श्रुतीची प्रमुख भूमिका असते हे जाणवले.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ही संस्था भारत सरकारच्या आर एन आय(RNI) शी संलग्न आहे. तसेच हो ची मिन्ह या व्हिएतनाममधील शहरात नॅशनल रेकॉर्ड बुक्स च्या एशीयन प्रोटोकॉल ऑफ रेकॉर्ड्स चे पालन करणाऱ्या एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स च्या बैठकीत सर्वानुमते एकमत झालेल्या या संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला. या यशस्वी कार्या बद्दल ची अध्यात्म चे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा