शिरोळमध्ये पावसाचा नैवेद्य मोठ्या उत्साहाने संपन्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
सालाबाद प्रमाणे परंपरेने चालत आलेल्या पावसाचा नैवेद्य आंबील मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने आज संपन्न झाला.
आज अखेर जो काही पडलेला पाऊस आहे तो स्वीकारून त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि उर्वरित पाऊस चांगला व्हावा म्हणून उत्तरा नक्षत्र च्या सुरुवातीस म्हणजेच पहिल्या सोमवारी हा पावसाचा नैवेद्याचा कार्यक्रम संपन्न होत असतो.
शिरोळ गावातील ग्रामस्थ, प्रत्येक समाजातील आणि गल्लीतील शेतकरी आपापल्या परीने भात आणि आंबील घेऊन श्री कल्लेश्वर मंदिर येथे येत असतात. सकाळी हेच शेतकरी मोठ्या भक्ती भावाने नदीतून घागरीने पाणी आणून श्री कल्लेश्वराची विधिवेत अभिषेक आणि दहिभाताचे लिंपण केले गेले. संध्याकाळी धनगर समाजाच्या भाकणुकीने सांगता होऊन. सर्वांनी भात अंबिलीचा प्रसाद घेऊन पुढील वर्षी समाधानकारक पाऊस व्हावा ही प्रार्थना करण्यात आली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा