जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड नगरपरिषदांना ३ कोटींचा निधी : आमदार यड्रावकर

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नगरपरिषदांना नमो उद्यान योजना अंतर्गत मोठा विकासनिधी देण्यात आला आहे. याअंतर्गत जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड नगरपरिषदांना प्रत्येकी एक कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील शहरांच्या सौंदर्यात भर पडणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

  याआधीही जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड पालिकांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या निधीतून शहरातील भुयारी गटार योजना, रस्ते, गटार बांधकाम, तसेच विविध समाजांसाठी सांस्कृतिक हॉल उभारणी यासह विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. त्यामुळे तीनही शहरांचा चेहरा-मोहरा बदलत आहेत.

आता पुन्हा प्रत्येकी एक कोटींचा निधी मिळाल्यामुळे या तीन नगरपरिषदांच्या विकास कामांना आणखी चालना मिळणार आहे. या निधीतून जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड या तिन्ही शहरांचा विकास मोठ्या प्रमाणात साधला जाणार आहे. राज्य सरकारकडून सातत्याने निधी मिळत असल्यामुळे स्थानिक पातळीवर अनेक अपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे शिरोळ तालुक्याचा विकास वेगाने होत असल्याचे सांगून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष