शेडशाळ जवळ कृष्णा नदी पात्रात मगरीचा वावर
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
शेडशाळ ( ता शिरोळ) येथील कृष्णा नदी पात्रामध्ये मगरीचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. सदर मगर काही वेळा नदी काठावर दिसून आली आहे .त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठावर बहुतांशी शेतकरीवर्गाचे कृषीपंप चालु-बंद करण्याचे मुख्य स्विचपेटी आहेत.यामुळे शेतीसाठी पाणी उपसा पंप चालू बंद करण्यासाठी शेतकर्यांना येथे रात्री- अपरात्री ये -जा करावी लागते. तसेच गावातील बहुतांशी महिलावर्ग कृष्णानदीकाठावर कपडे- धुणे धुण्यासाठी, व नागरिक अंघोळीसाठी जातात. मच्छीमार मासेमारीसाठी या नदीपात्राचा वापर करतात. सध्या येथील नदीपात्रात मगरीचा वावर दिसल्याने नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. तरी वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करुन वन्यप्राण्यासाठी सुरक्षित असलेल्या योग्य त्या ठिकाणी सोडण्यात यावे. अशी मागणी शेडशाळ मधील ग्रामपंचायत व ग्रामस्थांमधून होत आहे.
शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीहुन शेडशाळ,कवठेगुलंद,गौरवाड, औरवाड,नृसिंहवाडीपर्यंत कृष्णा नदी पुर्वेकडुन पश्चिशमेकडे वाहते.तर नृसिंहवाडीहुन बुबनाळ,आलास अशी उत्तरेकडुन दक्षिणेकडे वाहते.
शेडशाळ कृष्णाकाठावर मगर दिसुन आली असली तरी मगरीचा वावर हा या आठ गावातील नदीपात्रातुन कृष्णानदीकाठावर असणार आहे.यामुळे गौरवाडसह औरवाड,आलास,बुबनाळ,
कवठेगुलंद,शेडशाळ,गणेशवाडी, नृसिंहवाडी या आठ गावातील ग्रामस्थांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.
परिणामी आठ गावातील शेतकरीवर्ग,महिलावर्ग,ग्रामस्थांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तसेच मच्छीमारीसाठी नदीपात्रात जाणार्या व आंघोळीसाठी जाणार्या सर्वच व्यक्तीनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
शेडशाळजवळ कृष्णानदीकाठावर मगर दिसुन आली आहे.यामुळे शेडशाळ ग्रामपंचायतीने वनविभागाला एका लेखी निवेदनाद्वारे मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा