संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थ्यांनी अनन्या चव्हाणची महाराष्ट्र अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे या ठिकाणी इयत्ता दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी अनन्या राहुल चव्हाण हिची महाराष्ट्र महिला अंडर-१९ संघात निवड झाली. बीसीसीआय अंतर्गत असणाऱ्या आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन अंडर-१९ महिला टी-२० आमंत्रित स्पर्धा २०२५-२६ मध्ये अनन्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्रातील उदयोन्मुख युवा क्रिकेटपटू म्हणून तिची सगळीकडे ख्याती झाली आहे.

 यापूर्वी अनन्या महिला महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये रायगड रॉयल्स या संघाकडून खेळली आहे. या स्पर्धेत ती सर्वात तरुण खेळाडू होती. महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला अष्टपैलू खेळाडू म्हणून तिची ख्याती आहे. 

सदर स्पर्धा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात आंध्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आल्या असून सर्व सामने एसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, मंगलगिरी (विजयवाडा) येथे होणार आहेत. तिच्या या निवडीमुळे महाराष्ट्रातील युवा महिला क्रिकेट क्षेत्राला मोठी चालना मिळाली असल्याचे मानले जात आहे. तिच्या या निवडीबद्दल संस्थापक श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच. एम. नवीन, डे बोर्डिंगचे प्राचार्य अस्कर अली, क्रीडा संचालक आय वाय केंचन्नावर यांनी तिचे कौतुक केले, अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फेही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष