गौरवाडसह सात गावातील घराघरात, मंडळात,मंदिरात घटस्थापना

 


अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील गौरवाडसह,औरवाड,आलास, बुबनाळ,कवठेगूलंद, शेडशाळ,गणेशवाडी या सात गावातील घराघरात,विविध नवरात्रोत्सव मंडळात तसेच अनेक मंदिरात सोमवारी मुहुर्ताची वेळ साधून विधीवत घटस्थापना करण्यात आली.  नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रुपांच्या सन्मानार्थ केला जातो.स्त्री शक्तीला हा उत्सव समर्पित केला गेला आहे.वाईटावर चांगल्याचा विजयाचे आणि दैवी शक्तीचा हा सण प्रतिक आहे.

  सोमवारपासुन नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने घरात, गावातील मंडळात,मंदिरात देवी दुर्गाच्या विविध रुपांची पुजा होणार आहे.

  सोमवारी गौरवाडसह सात गावातील घराघरात मुहुर्ताची वेळ साधुन देवी दुर्गाची विधीवत पुजा करुन घटस्थापना करण्यात आली.तसेच खाऊच्या पानाची पहिली माळ बांधण्यात आली.

 गौरवाडसह सात गावात एकुण २२ नवरात्र मंडळाकडुन दुर्गामातेच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.यासाठी अनेक मंडळानी माता दुर्गेची मूर्ती वाजत गाजत आणली.विविध मंडळानी मुहुर्ताची वेळ साधुन दुर्गा माता मुर्तीची विधीवत प्रतिष्ठापना केली.

तर काही मंडळानी कोल्हापुर,तुळजापुर,मंगसुळी आदी ठिकाणाहुन पायी दुर्गाज्योत आणली. नवरात्रोत्सवानिमित्त अनेक मंडळाकडुन विविध धार्मिक कार्यक्रमासह महिलासाठी हळदी- कुंकु,होम मिनिस्टर,पारंपारिक पध्दतीचे सोंगी भजन,गोंधळ ,महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 सर्व मंदिराना आकर्षक विद्युत रोषणाई करुन विविध फुलांनी सजविण्यात आले आहे.

  नवरात्र उत्सव काळात सर्वच मंदिरात दर्शनासाठी व तेल घालण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.त्या अनुषंगाने मंदिरात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत येणार्‍या विविध गावातील एकुण ८६ नवरात्रोत्सव मंडळाकडुन दुर्गामाताची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.या नवरात्र उत्सव काळात कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडुन २ अधिकारी,१० पोलीस अमंलदार,२५ होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष