अखिल भारतीय किसान सभेची निदर्शने, तहसीलदारांना निवेदन



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्याबाबत शिरोळ तालुक्यातील देवस्थान जमीनधारक व शेतकरी यांनी बुधवारी (दि. २४) तहसील कार्यालय येथे निदर्शने करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देऊन मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने सोमवार दि. १५ सप्टेंबर पासून २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीन धारक शेतकरी तसेच इतर खाजगी ट्रस्टशी संबंधित सर्व देवस्थान शेतकरी सहभागी होत आहेत. सरसकट सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा आणि देवस्थान शेतकऱ्यांचे पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अमोल नाईक, नारायण गायकवाड, बसगोंडा पाटील, ए. वाय. जाधव, मदन मस्के, कृष्णदेव इंगळे, बी. जे. पाटील, प्रकाश आवटे, अमृत अनुजा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष