कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रात १५३ रुग्णांची तपासणी


अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

कवठेगुलंद (ता.शिरोळ ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात "स्वस्थ नारी,सशक्त परिवार" अभियान अतर्गंत १५३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या या अभियान अंतर्गंत चौधरी हाॅस्पिटल यांच्या वतीने आयोजीत शिबिरात ही तपासणी करण्यात आली.

 यामध्ये सर्व वयोगटातील १२२ महिला व किशोरवयीन मुलींची स्त्री रोग तज्ञामार्फत तर १८ बालकांची बालरोग तज्ञातर्फे आरोग्य तपासणी करुन मोफत औषधे देण्यात आली.तसेच १३ रुग्णांची ईसीजी करण्यात आली.

  सदर शिबीराचे उद्दघाटन ,दिपप्रज्वलन,प्रतिमा पुजन कवठेगुलंदचे सरपंच,माजी सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रा.प.सदस्य,ग्रामसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.

 कार्यक्रमास नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.सौ.पाटील,कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.राम,डाॅ.जयपाल,आरोग्य सहाय्यक,सहाय्यिका,चौधरी हाॅस्पिटलच्या डाॅ.सौ.डिग्रजे,सर्व कर्मचारी,नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रामधील सर्व सीएचओ,एमपीडब्लु,एएनएम, आशा ताई,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरोग्यसेवक रमजान सनदी यानी केले तर आभार आरोग्य सहाय्यक मेंगाणे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष