शिरोळ तालुक्यात २४ तासात ८० मिलिमीटर पावसाची नोंद
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा दमदार आगमन केले आहे. दुपारपासून सुरू झालेला पाऊस शनिवारी सायंकाळपर्यंत जोरदार पडत होता. शुक्रवारी रात्री ते शनिवार सकाळपर्यंत २४ तासात तालुक्यात 80 मिलिमीटर पाऊस पडला आहे. दरम्यान, एक सारखा मुसळधार पाऊस सुरू असल्याने सखल भागात पाणी साचले असून नुकताच लावण केलेले ऊस व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, भुईमूग पीक काढण्यासाठी आले असून सतत पडणाऱ्या पावसामुळे त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. एकटाच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकल भागात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागले. नुकत्याच लावण करण्यात आलेल्या उसाला या पावसामुळे फटका बसणार आहे. काही ठिकाणी उसाची रोपे पाण्याखाली गेली आहेत. तर भाजीपाला पिके सततच्या पावसाने खराब झाले आहेत. तीव्र उन्हाचा तडाका व मुसळधार पाऊस असा गेला महिनाभर खेळ सुरू असल्याने सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम चा शेवटचा टप्पा असून सोयाबीन, भुईमूग, उडीद ही पिके प्रामुख्याने शिरोळ तालुक्यात घेतली जातात. सध्या काही ठिकाणी पिके काढण्याचे काम सुरू असून न काढलेली पिके शेतातच कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा