उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता ही गरजेची : नगरसेवक, शरद जंगटे

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

        आपले शरीर चांगले, निरोगी रहावे व सुदृढ व्हावे यासाठी उत्तम आरोग्याचे गरज असते. या उत्तम आरोग्यासाठी आपण स्वच्छतेला अधिक  महत्त्व दिले पाहिजे. आपले घर परिसर गाव स्वच्छ ठेवल्यास कोणतेच रोगराई येत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आज त्यांच्यामुळेच संपूर्ण भारत देश स्वच्छतेत आघाडीवर असल्याचे मत हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिनी सेवा पंधरवडा निमित्त बोरगाव शहर आज बोरगाव भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यातआले.

आरोग्य, स्वच्छता, संस्कार शिक्षण, संस्कृतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिले आहे आमचे नेते आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सुद्धा संपूर्ण मतदारसंघात आरोग्य स्वच्छता व शिक्षणाला महत्त्व दिल्याने आज मतदार संघातील जनता ही निरोगी आहेत. प्रत्येकाने स्वच्छतेला महत्त्व देऊन आपले आयुष्य निरोगी बनवावे असे शेवटी जंगटे यांनी सांगितले.

यावेळी जितु पाटील,, बी. के महाजन, अजित कांबळे, अजित तेरदाळे, राजू लटलटे, महादेव ऐदमाळे, भरत पाटील, शेसु ऐदमाळे, फिरोज अफराज, किसन गोसावी, बिपिन देसाई,  सम्मेद पाटील, भाऊसाहेब नाईक,भरत जंगटे, सर्जेराव धनवडे सह भाजप कार्यकर्ते, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष