मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी यड्रावकर सोशल फाउंडेशनकडून ३ ट्रक चारा

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अशा संकटाच्या काळात शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फाउंडेशनने पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे.

यड्रावकर फाउंडेशनच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी ३ ट्रक कडबाकुट्टी चारा पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्तीच्या काळात मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत यड्रावकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. निसर्गाने जरी वक्रदृष्टी केली तरी आपत्तीच्या काळात एकमेकांना आधार देणे हा मानवतेचा नियम असल्याने पूरग्रस्त भागात जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत असताना या मदतीमुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यड्रावकर फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राबविलेल्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यावेळी माजी मंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, पंचगंगा साखर कारखाना मा. चेअरमन पी. एम. पाटील, शरद सहकारी साखर कारखाना संचालक सुभाषसिंग रजपूत, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अजित उपाध्ये, शरद सहकारी साखर कारखाना संचालक आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर, रविकांत कारदगे, संजय नांदणे, केशव राऊत, रावसाहेब कुंभोजे, सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले, अण्णासाहेब क्वाने,पोपट भोकरे, प्रकाश लठ्ठे यांच्यासह आमदार राजेंद्र पाटील डॉ. यड्रावकर सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष