दसरा सणानिमित्त घरोघरी युध्दपातळीवर स्वच्छता मोहीम

 नदीघाटावर अंथरुण धूण्यासाठी गृहिणींची गर्दी.

 अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

  येत्या सोमवारी दि.२२ रोजी घटस्थापना आहे.या दिवसापासुन शारदीय नवरात्ररंभाला प्रारंभ होत आहे.हिंदु धर्मात या सणाला फार महत्व आहे.हा सण पावित्र्याचा,मांगल्याचा,आनदांचा,ऐश्वर्याचा मानला जातो.दसरा हा साडेतीन मूहुर्तातील हा एक सण आहे. 

यानिमित्त हिंदु धर्मीय लोक पंरपंरेप्रमाणे आपल्या घराची स्वच्छता करतात.यानुसार घटस्थापनेपुर्वी गावोगावी घरांची युध्दपातळीवर स्वच्छता मोहीम सुरु असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

 गृहिणीवर्ग आपल्या घरातील पसारा,स्वयंपाकाची भांडी,इतर साहित्य स्वच्छ करण्यात व्यस्त असल्याचे दिसुन येत आहे.तर पुरुषवर्ग घरातील पसारा बाहेर ,बाजुला ठेवून संपुर्ण घराची झाडा-झडती करुन पाण्याने घर धुवुन काढण्यात व्यस्त आहेत.

 घराची स्वच्छता करताना गृहिणीना सर्वात जास्त काम करावे लागते.स्वंयपाक घरातील सर्व भांडी,अडगळीतील भांडी काढुन स्वच्छ धुवुन,पुसुन,वाळवुन पुन्हा आवश्यक भांड्याची मांडणी करावी लागते.

आज बहुतांशी ९० टक्के घरे ही आरसीसीची आहेत.अशा घरांना स्वच्छ करण्यासाठी फार वेळ लागत नाही.मात्र जी काही १०टक्के मातीची,कौलारु घरे आहेत,त्यांना स्वच्छ करण्यासाठी वेळ लागतो.कारण यांना घरातील संपुर्ण पसारा घराबाहेर,अंगणात ठेवावा लागतो.यानतंर घराची झाडा-झडती करुन घराच्या भिंती पांढर्‍या मातीने,शेणाने सारवायला लागते.यासाठी छोट्या घरानांही स्वच्छता करण्यासाठी दोन-तीन दिवस लागतात.अशावेळी घराची स्वच्छता करण्यासाठी घरातील आबालवृद्धांचे हात दिवसभर काम करीत असतात.

 घरातील स्वच्छता झाल्यावर गृहिणी सर्व पसारा व्यवस्थित लावुन घेतात.यानतंर घरातील वापरात असलेले तसेच कधीतरी वापरात येणारे सर्व अंथरुण..पांघरुण गावातील नदीघाटावर, विहीरीवर,बोअरवेल आदी ठिकाणी धुण्यासाठी महिंलाची गर्दी दिसुन येत आहे.

  घटस्थापनेपुर्वी एक -दोन दिवस अगोदरच घराची स्वच्छता करुन घेतली जाते.बहुतांशी गृहिणीनी घराची स्वच्छता केली आहे.तर जे काही वेळेअभावी राहीलेत ते आता युध्दपातळीर घराची स्वच्छता करीत आहेत.

   या आठवड्यात परतीच्या पावसाचा तडाखा सुरु आहे.यामुळे वातावरणातील पावसाचा अंदाज घेऊनच गृहिणी नदीघाटावर अंथरुण धुण्यासाठी जात आहेत.परिणामी नदीघाटावर अंथरुण ,कपडे धूवुन वाळवत घालण्यासाठी महिंलाची गर्दी दिसुन येत आहे.


आज बहुतांशी घरात वाॅशिग मशिन आहेत.यामुळे घरातील दररोजचे कपडे,छोटे लहान अंथरुण धूण्यासाठी या मशिनचा वापर केला जात आहे.मात्र नदीघाटावर सहकुटुंब अंथरुण घेऊन घाटावर बडवुन नदीच्या पाण्यात खळाखळा धुवुन..घाटाच्या पायर्‍यावर वाळवुन आणण्यात जो एक आनंद मिळतो.तो वाॅशिग मशिनमध्ये कुठुन येणार? तसेच नदीघाटावर जेवढे स्वच्छ अंथरुण धुतले जातात...तेवढे मशिनमध्ये धुतले जात नाहीत.यामुळे बहुतांशी ग्रामीण भागातील गृहिणी नदी,विहीरीवरच दसर्‍याचे अंथरुण धुण्यासाठी सहकुटुंब जातात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष