हेरवाड हायस्कूलचा तालुका कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
पद्माराजे विद्यालय शिरोळ येथे शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या शासकीय तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात हेरवाड हायस्कूल हेरवाड संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानंतर हेरवाड संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत हेरवाड संघाने दमदार खेळ सादर केला. उपांत्य फेरीत कुरुंदवाड येथील माध्यमिक विद्यालय (सैनिकी शाळा) संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात हेरवाड संघाने साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड यांना चार गुणांनी मागे टाकत विजेतेपद पटकावले.
विजयी खेळाडूंना साने गुरुजी शिक्षण संस्था कुरुंदवाडचे अध्यक्ष मा. रावसाहेब उर्फ दा. पाटील, सचिव अजित पाटील, सर्व संचालक, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश मोहिते सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले. तर क्रीडा शिक्षक अजित दिवटे व राजमुद्रा क्रीडा मंडळ हेरवाड यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हेरवाड परिसरात विजयी संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा