उसाचा दुसरा हप्ता देऊन कारखाने लवकर सुरु करा ; कारखान्यांना निवेदन देणार : धनाजी चुडमुंगे

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

साखर कारखाने हे प्रक्रिया उद्योग आहेत या कारखान्यात शेतकऱ्यांचा कच्चा माल असलेल्या उसाचे पक्या मालात रूपांतर करून तो पक्का माल बाजारात विकायचा आणि उत्पादन खर्च भागवून उर्वरित सर्व पैसे कच्या मालाच्या उत्पादकाला द्यायचे असतात.गत वर्षात उसा पासून मिळालेल्या साखर बग्यास आणि मळीला इतिहासातील उच्य दर मिळालेले आहेत आणि त्यातून मोठा फायदा कारखान्यांना झालेला आहे. या फायद्यातून आलेल्या पैशातून शेतकऱ्यांना सप्टेंबर अखेर पर्यंत दुसरा हप्ता देऊन ऊस हंगाम 1 ऑक्टोबर पासून सुरु करा या मागणी साठी आंदोलन अंकुश कडून सोमवारी मोटर सायकल रॅलीचे आयोजन केल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले आहे.

ते आज माध्यमाशी बोलत असताना पुढे म्हणाले की साखर कारखान्यांना हंगामाच्या तोंडावर आंदोलन नको असेल तर त्यांनी उसाच्या दुसऱ्या हप्त्या बाबत जाहीर पणे भूमिका मांडावी, कारखान्यांच्या वार्षिक सर्व साधारण सभेपूर्वी सभासदांना दुसरा हप्ता किती व केव्हा देणार हे सांगावे, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनाशी चर्चा करून तोडगा काढून आंदोलन होणार नाही याची दक्षता घ्यावी यासाठी आम्ही निवेदन घेऊन कारखान्यांना विनंती करणार आहोत. शेतकऱ्यांनी या मोटर सायकल रॅली मध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष