जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त हेरले येथे वृक्षारोपण कार्यक्रम

 


संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

 हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त हेरले परिसर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शिदोबा डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात फार्मासिस्ट शपथ घेऊन करण्यात आली. त्यानंतर तब्बल ५१ झाडांची वृक्षारोपण करण्यात आली.

या प्रसंगी शिरोली ते हातकणंगले केमिस्ट असोसिएशनचे सचिव अभिषेक मोहिते, हातकणंगले तालुका केमिस्ट असोसिएशनचे संचालक अविनाश चौगुले, हेरले केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप हणमंत, उपाध्यक्ष संग्राम सावंत, सचिव जुबेर हजारी तसेच प्रवीण पाटील, विशाल परमाज, सर्जेराव सावंत, स्वप्नील राऊत, रामचंद्र चौगुले आदी सदस्य उपस्थित होते.

सदरील उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच समाजात औषध व्यवसायाशी निगडित जबाबदारीची जाणीव अधोरेखित करण्यात आली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष