सभासदाच्या विश्वासावर दत्त नागरी पत संस्थेचा १०० कोटी रुपयांचा ठप्पा पूर्ण - माधवराव घाटगे
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
सभासदांची विश्वाहर्ता हीच दत्त नागरी पत संस्थेची ओळख असून संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी १०० कोटीच्यावर गेल्या असल्याने दत्त नागरी पत संस्थेला परत सोन्याचे दिवस येथिल असा विश्वास श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केला. श्री दत्त नागरी सहकारी पत संस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडली. त्याप्रंसगी श्री . घाटगे बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने- देशमुख यांनी केले. जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचे वाचन केल्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरेत सर्व विषय एकमतांने मंजूर केले.
यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले, दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत चालला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ठेवीत ७ कोटी ५३ लाख रुपये इतकी वाढ होऊन ठेवी ९५ कोटी ७८ लाखावरून १०३ कोटी ३३ लाख वरती पोहचल्या आहेत. पत संस्थेला ५० वर्ष पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सवी वर्षात ठेवीचा १०० कोटीचा ठप्पा पार करून संस्थेची यशस्वी घौडदौड सुरू आहे. सभासद व शेतकरी यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी दत्त नागरी मोलाचा वाटा उचलणार असल्याचा आशावाद यावेळी श्री. घाटगे यांनी व्यक्त केला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय), वेस्ट इंडिया शुगर मिल असोशिएशन ( विस्मा ) व नवी दिल्ली येथिल सिया या संस्थेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार श्री गुरुदत्त शुगर्स ला मिळालेबदल चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने -देशमुख व व्हा.चेअरमन धोंडीरम खोत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सभेला गुरुदत्त चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहूल घाटगे, धीरज घाटगे गुरुदत्त शुगर्स चे संचालक धोंडीराम नागणे, शिवाजी सांगले ,चिंचवाडचे सरपंच जालिंदर ठोमके, जि.प. चे माजी बांधकाम सभापती महादेवराव धनवडे , गुंडू दळवी, कवठेसारचे माजी सरपंच यशवंत गुरव ,शिरोळ चे नगरसेवक श्रीवर्धन माने - देशमुख, दत्त नागरी पत संस्थेचे माजी व्हा.चेअरमन अशोक जगताप, जोती गोधडे, केशव घाटगे व सर्व संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. आभार संचालक भास्कर कांबळे यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा