जयसिंगपूर येथे क्रिकेट सट्टा घेणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क
दुबई येथे आशिया टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू असून भारत-बांगलादेश या सामन्याचा सट्टा घेत असताना जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी राजीव गांधी नगर येथील बजरंग शशिकांत बिडकर वय ३४ यांना यांचे राहते घरी रंगेहात ताब्यात घेतले आहे यावेळी १ लाख ४२ हजार २५० रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप हनुमंत बांडे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.
बुधवार 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर येथे बजरंग शशिकांत बिडकर हा राहते घरी दुबई येथे सध्या सुरू असलेल्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे भारत व बांगलादेश क्रिकेट सामन्याचे लाईव्ह सामन्याचे सट्टा घेत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर जयसिंगपूर उपविभागीय पोलिस कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रंगेहाथ बिडकर यांना ताब्यात घेतले आहे या दरम्यान मोबाईल तसेच रोख रक्कम असे एकूण एक लाख 42 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कामी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश हंकारे हे करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा