एम. के. मार्ट कारदगा शाखेचे थाटात उद्घाटन
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर जिन मुनींच्या पवित्र आशीर्वादाने स्थापित झालेल्या बोरगाव या नगरीत सागर मिरजे व शीतल कमते यांच्या सहकार्यातून एम के मार्च ची स्थापना करण्यात आली आहे. व्यवहारातील पारदर्शकता व प्रामाणिकपणा यामुळे बोरगाव सह परिसरात ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे काम सुपर बाजार च्या माध्यमातून एम. के मार्ट ने केली आहे. याच उद्देशाने निपाणी तालुक्यातील ज्ञान नगरी म्हणून नावारूपास आलेल्या कारदगा येथे परमपूज्य स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी श्री संस्थान मठ नांदणी, अभिनव मंजुनाथ महास्वामीजी हुक्केरी व करदगा बंगाली बाबांचे मौलाना यांच्या दिव्य सानिध्यात फीत कापून या बोरगावच्या एम के मार्च शाखेचे शुभारंभ करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महामुनींच्या पवित्र चरण पूजनाने करण्यात आली ,यावेळी नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी व हुकरीचे परमपूज श्री अभिनव मंजुनाथ महास्वामीजी व कारदगा बंगाली चे प्रमुख मौलाना यांनी आशीर्वाचन केले .
यावेळी बोलताना एम के मार्च संस्थापक अध्यक्ष सागर मिरजे म्हणाले की एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या संतांच्या वचनांना आपलेसे करून आम्ही कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील सीमेवर वसलेल्या बोरगाव शहरात आम्ही एम के मार्ट उभारणी केली आहे . निस्वार्थ सेवा, व्यवहारातील पारदर्शकता, उत्तम दर्जा ,उत्तम सेवा आपुलकी व सणासुदीच्या कार्यक्रमात ग्राहकासाठी खरेदीवर डिस्काउंट ऑफर ची सुविधा देण्यात एम के मार्ट नी आपली अतुलनीय विश्वासार्हता निर्माण केली आहे, याच उद्देशाने कारदगा व परिसरातील ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी एम के मार्च माध्यमातून जनसेवा केली जाणार असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष श्री सागर मिरजे यांनी केले.
या कार्यक्रमास परमपूज्य स्वस्तश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महा स्वामीजी संस्थांन मठ नांदणी व परमपूज्य श्री अभिनव मंजुनाथ महा स्वामीजी श्रीक्षेत्र यादगूड मठ हुकेरी व बंगाली बाबा चे मौलाना कारदगा, माजी जिल्हा पंचायत सदस्या सौ सुमित्रा उगळे, आदगोंडा पाटील भोज,कारदगा ग्रामपंचायत चे माजी अध्यक्ष राजू खिचडे सर, चिकोडी दिया हॉस्पिटलचे डॉक्टर संजीव पाटील, जीवन हॉस्पिटल मांजरीचे डॉ, रमेश खिचडे ,बोरगाव येथील जीन लक्ष्मी संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील ,प्रवीण हावले ,सुधीर तेरदाळे, संजय नरवाडे, बाहुबली सोबाने,भारत देमापूर, श्रीमंधर देमापूर, अल्टीयास टेक्निकल मुंबईचे संस्थापक अध्यक्ष सागर मिरजे बोरगाव एमके मार्च उपाध्यक्ष शितल कमते यांच्या सह मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजू खिचडे सर यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा