जयसिंगपूरातून तरुणी बेपत्ता


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

जयसिंगपूर पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर नं. 80/2025 अन्वये रेशम अब्दुल्हमीद सन्नकि (वय 21, रा. बेघर वसाहत, उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ही तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, रेशम हिने दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी सात वाजण्यापूर्वी कोणास काही न सांगता घरातून बाहेर पडून गेले. त्यानंतर ती परत आलेली नसल्याने तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

बेपत्ता रेशम हिचे वर्णन असे – अंगाने मध्यम, उंची पाच फुट, गोरा रंग, गोल चेहरा, रुंद कपाळ, सरळ लांब नाक. अंगात निळ्या रंगाचा टॉप त्यावर पांढऱ्या रंगाची फुलांची डिझाईन, निळ्या रंगाची विजार, पायात चप्पल. ती हिंदी व मराठी भाषा बोलते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष