पोर्ले गावात पोलीस पाटील पद रिक्त; अण्णा ब्रिगेडची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे या गावातील पोलीस पाटील पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुमारे १५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील पोलीस पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे.या पदाच्या अभावामुळे सरकारी कामे, दाखले मिळवणे तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यात अडथळे निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी आणि नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी तीन किलोमीटर दूर आसुर्ले येथे जावे लागते. सध्या पोर्ले गावाचा पदभार आसुर्ले येथील पोलीस पाटील श्री. पंडित वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे आधीच दोन गावांचा पदभार असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था अण्णा ब्रिगेडने पुढाकार घेत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पोर्ले गावातील पोलीस पाटील पद तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल महापुरे, जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे, निलेश महापुरे, शलमोन लोखंडे, रोहित सुवासे, दीपक चव्हाण, अमोल धोंगडे, अजय कदम, दिनकर साठे, अमोल बुचडे, शिवाजी वारे, शशिकांत बुचडे, योगेश सकटे, गणेश मोरे, प्रदीप मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष