पावसामुळे गौरवाडमध्ये उभा ऊस भुईसपाट

 


अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या दोन दिवसापासुन सुरु असलेल्या पावसामुळे गौरवाडमधील आप्पासो गडगले या शेतकर्‍यांचा उभा ऊस भुईसपाट झाला आहे,

  गौरवाड ता.शिरोळ येथील आप्पासो गडगले यांचे गौरवाड - कवठेगुलंद दरम्यान कमंत फाट्याजवळ एक एकर ऊसाचे क्षेत्र आहे.सद्या या ऊसाला २८ ते ३० कांड्या तयार झाल्या आहेत. सरासरी एकरी ८०-८५ टन ऊस निघाला असता.मात्र पावसामुळे उभा ऊस पडल्यामुळे याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.कारण उभा ऊस पडल्यानतंर ऊसाला पुन्हा मुळ्या सुटतात.व वजन कमी भरते.परिणामी संबधित शेतकर्‍यांना याचा मोठा अर्थिक फटका बसतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष