आलास ए.बी.हायस्कुलमध्ये सुलेखन कार्यशाळा
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
आलास (ता.शिरोळ) येथील कलाश्री डाॅ.बा.ग.पवार आलास - बुबनाळ विद्यालयामध्ये सुलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेतुन सुंदर अक्षर हाच खरा दागिना या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधरावेत व चांगले वळणदार अक्षर यावेत यासाठी वर्षभर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी शेडशाळ केंद्रप्रमुख संदीप कांबळे यानी भेट देऊन सुलेखन कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल शाळेचे कौतुक केले.तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमावेळी जिमखाना विभाग प्रमुख ए.बी.येवारे,इंग्रजी विषय विभाग प्रमुख व्ही.एन.पाटील,गणित विभाग प्रमुख आर.बी.मखमल्ला,विज्ञान विभाग प्रमुख एस.एस.पाटील,शिष्यवृत्ती विभाग व पोषण आहार विभाग प्रमुख पी.एस.चाटे,कु.क्षितिजा जोशी,एस.एस.गावडे,सुलेखन अक्षरमित्र एस.डी.केंगाळे यांच्या उपस्थितीत २६ विद्यार्थ्यांना सुलेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच ३ होतकरु विद्यार्थ्यांना सुलेखनाचे मोफत साहित्य दिले.
कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एस.कोळेकर यांनी केले.आभार पी.एस.चाटे यांनी मानले.यावेळी समारंभप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एस.गावडे,सेवक दत्ता धुमाळे,आप्पासो शिंदे,गोपाळ मोरे यांच्यासह विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा