फार्मसिस्ट हे समाजाच्या आरोग्याचे खरे मार्गदर्शक : प्रा. जरीन नदाफ
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचालित संजय कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने फार्मसिस्ट डे उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.झरीना नदाफ ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ऐश्वर्या अण्णासाहेब हवले उपस्थित होत्या.
माजी जिल्हा पंचायत सदस्य आण्णासाहेब हवले यांनी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना अल्प दरात वैद्यकीय शिक्षणं मिळावे यासाठी कॉलेज सुरू केले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यां आज याठिकाणी शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचले आहेत.
कार्यक्रम दरम्यान प्रा जरीन नदाफ म्हणाल्या, की “फार्मसिस्ट हा आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाचा दुवा आहे. औषधोपचार योग्य पद्धतीने रुग्णापर्यंत पोहोचविण्यात फार्मसिस्टाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णाला औषधाचे योग्य डोस, वेळ व परिणामकारकते बद्दल योग्य मार्गदर्शन करणे ही फार्मसिस्टाची जबाबदारी आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील सेतू म्हणून फार्मसिस्ट सदैव कार्यरत असतो. त्यामुळे फार्मसिस्ट केवळ औषधे देणारा व्यक्ती नसून समाजाच्या आरोग्यरक्षणाचा खरा दुवा आहे असे मत नदाफ यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रजात खोत, सार्थक आरगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. विरकुमार गोरवाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्वागतगीत बिस्मिल्ला मकानदार यांनी सादर केले. यावेळी प्रिन्सिपॉल डॉ संदीप मुर्तुले,विनायक तळंदगे, प्रवीण कामगोल , चैतन्य पूजारी आदी उपस्थित होते. दर्शन पाटील यांनी आभार मानले तर प्रीती मगदूम (पाटील) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. फार्मसिस्ट डेच्या औचित्याने विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध संधी व जबाबदाऱ्या यांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला फॉर्मशी कॉलेज चे विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
======================= बोरगाव हुन प्रतिनिधी अजित कांबळे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा