मानसिक व शारीरिक छळप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : 

शिरोळ पोलिसांनी सौ. स्वाती संतोष कुमठेकर (वय 38, रा. प्लॉट नं. 122, आंबेडकर हौसिंग सोसायटी, शिरोळ) यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीविरुद्ध मानसिक व शारीरिक छळप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती व आरोपी संतोष शिवराम कुमठेकर (मूळ रा. शिरसंगी, ता. आजरा, सध्या रा. मुंबई) हे नात्याने पती-पत्नी आहेत. दिनांक 26 जून 2011 पासून 10 जुलै 2025 या काळात फलटण, पुणे, मुंबई येथे वास्तव्यास असताना आरोपीने वारंवार फिर्यादीवर मानसिक व शारीरिक छळ केला.

आरोपीने तू माहेरून काही आणले नाहीस, तुला मुल होत नाही, मी तुला नांदवणार नाही, दुसरे लग्न करणार अशा शब्दांत अपमानित केले. तसेच घटस्फोट देण्यास भाग पाडले, माहेरच्यांचा अपमान केला, शिवाय मारहाण करून घराबाहेर काढले, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.

याप्रकरणी फिर्यादीने महिला समुपदेशन केंद्र, कुरुंदवाड येथे तक्रार दिली होती. मात्र तेथेही आरोपीने नांदवणार नाही, मुल होत नाही, पोटगी देणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर स्वाती कुमठेकर यांनी थेट पोलिसांत धाव घेवून तक्रार दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष