जयसिंगपूर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत सोन्याचे गंठण लंपास

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

जयसिंगपूर येथील एस.टी. बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेला गंडवून जवळील सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिता मल्लाप्पा पुजारी (वय 45, रा. कोथळी, ता. शिरोळ) या महिला 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान जयसिंगपूर एस.टी. स्थानकात बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले. या गंठणामध्ये सुमारे 5 ग्रॅम सोन्याचे 75 मणी व 5 ग्रॅम वजनाचे पेंडल होते. 2018 मध्ये तयार केलेले हे दागिने जुने वापरते असून त्याची किंमत अंदाजे 49 हजार रुपये एवढी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष