शिरोळ पोलिस ठाण्यामार्फत ‘एकता दौड’ संपन्न

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

भारताचे पहिले गृहमंत्री, देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शिरोळ पोलीस स्टेशनतर्फे “एकता दौड”चे आयोजन शुक्रवारी करण्यात आले.

ही एकता दौड छत्रपती शिवाजी चौक येथून सुरू होऊन शिरोळ पोलीस ठाणे येथे संपन्न झाली. या प्रसंगी एकता, राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाची सांगता पंचायत समितीऐ आवारातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतीज्योत यांच्या पुतळ्यांना

 यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, रोटरी क्लब हेरिटेज सिटीचे अध्यक्ष मेजर प्रा. के. एम. भोसले, शिवप्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष प्रवीण चूडमुंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या एकता दौडीत शिरोळ शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, तसेच पोलिस कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शिरोळ पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना सहभागी होऊन समाजात एकतेचा संदेश देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष खंडेराव हेरवाडे, रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य चंद्रकांत भाट, रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष डॉ. अंगराज माने, सचिन देशमुख, युवराज जाधव, अजिंक्यतारा मंडळाचे शक्तीजित गुरव, तसेच सिताराम शिंदे, शैलेश कोळी, वैभव माने मानसिंग रजपूत दिलीप कोळी यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले.

पोलीस कर्मचारी संजय नाईक, शहाजी बंडगर, दिलीप कुंभार, राजाराम पाटील, राजेंद्र पुजारी, बाबाजान पटेल, अभिजीत कांबळे, महाबरी, अमित कदम, सुहास कुरणे, संदीप जाधव, अविनाश वारके, अमित धुमाळ, संजय राठोड, राजेंद्र ओमासे, संग्राम खराडे, युवराज खरात, रविदास धनवे, महेश बांगर, संदीप रानमाळे, विश्वनाथ खरमाटे सावित्री खंडागळे, सुजाता पाटील, वनिता खाडे, तसेच पोलीस पाटील व गृह रक्षक दलाचे जवान उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष