शेडशाळ येथील स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन देशी वाण बीज बँकेच्या वतीने बीजांचे टोकण
शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून शेडशाळ (ता. शिरोळ) येथील स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन देशी वाण बीज बँकेच्या वतीने प्रांताधिकारी मोसमी चौगुले बेर्डे व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून देशी वाण बीजांचे टोकण करण्यात आले. तसेच डॉक्टर्स डे निमित्ताने गावातील सर्व डॉक्टरांचाही सत्कार करण्यात आला. शेडशाळ येथील 130 महिलांनी एकत्र येऊन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देशी वाण बीज बँकेची स्थापना केली आहे. आत्तापर्यंत 50 च्या वर देशी वाणांचीची जोपासना आणि संवर्धन करण्यात आले असून या बियांना मोठी मागणीही प्राप्त होत आहे. याचा विचार करून गावातील 30 गुंठे जागा महिलांनी भाडेतत्त्वावर घेऊन आज त्या जागेत देशी वाण बियांचे टोकन केले. शेडशाळ येथील महिलांनी देशी वाण बियांच्या संगोपन व संवर्धनाचे करत असलेले काम हे मानवी जीवनासाठी, मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे. देशी वाण बीज संगोपनाची महिलांची ही चळवळ ...