साहित्यिकांनी नेमक्या परिस्थितीचे दर्शन घडवावे
दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनात ख्यातनाम कवी रामदास फुटाणे यांचे प्रतिपादन शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : राजकारणासाठी धर्माचा वापर होत असून राजकारणाला वैचारिक बैठक राहिलेली नाही. याचा वाईट परिणाम प्रत्येकाच्या घरापर्यंत, चुलीपर्यंत आपण बघतो आहोत. त्यामुळे साहित्यिकांनी नेमक्या परिस्थितीचे दर्शन घडविणे गरजेचे आहे. त्याच पद्धतीने धर्म आणि विज्ञानाची सांगड घालून जगणे आवश्यक आहे. आपला धर्म, जात इतरांना त्रासदायक ठरणार नाही, माणसांमध्ये भिंती उभ्या राहणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी साहित्य संमेलने आवश्यक आहेत, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष, ख्यातनाम कवी रामदास फुटाणे यांनी केले.शिरोळ येथील शब्दगंध साहित्य परिषद तर्फे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती नवव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. रामदास फुटाणे पुढे म्हणाले, साहित्यिकांच्या विचारांची बैठक पक्की असेल तर समाज बांधण्याचे मोठे काम साहित्य संमेलने निश्चित करू शकतात. साहित्याच्या जाणीवा प्रगल्भ असाव्यात. यासाठी साहित्यिकांन...