पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शरद कृषि महाविदयालयाच्या कृषिदुतांचे हेरवाड गावामध्ये आगमन

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : शरद कृषि महाविद्यालय जैनापुर येथील चतुर्थ वर्षातील विदयार्थी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार कृषिदुत म्हणून प्रशिक्षणासाठी हेरवाड गावामध्ये दाखल झाले असुन ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. हे कृषिदुत शेतीविषयक माहीती, कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करणे, तसेच शेतकऱ्यांना माहीतीपर प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. यावेळी सरपंच रेखा जाधव, उपसरपंच , सचिन पाटील, ग्रामसेवक पल्लवी कोळेकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कृषिदुतांनी विविध उपक्रमांची माहीती दिली. यावेळी कृषिदुत यश उपाध्ये, पार्श्वनाथ वाडकर, सुरज यादव पाटील , समाधान खरात, चैतन्य देवकर, मेघराज मोरे उपस्थित होते.  या उपक्रमासाठी महाविदयालयाचे प्राचार्य प्रा.एस.एच फलके ,कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.टी. कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.एस माळी सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

महापुराच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
महापुराच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक संपन्न शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  सद्यस्थिती पाहता महापुराचे संकट ओढावेल अशी शक्यता वाटत नाही, तरी देखील नागरिकांनी गाफील राहू नये, धरण क्षेत्रात पडणारा एकूण पाऊस, धरणातील पाणीसाठे, धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग या सर्व गोष्टींवर प्रशासनाचे लक्ष असून महापूर येऊ नये यासाठीच्या उपाययोजना करण्याबरोबरच, महापूर आलाच तर आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली, संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुका आपत्ती विभागाची बैठक शिरोळ तहसीलदार कार्यालयात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बोलवली होती यावेळी ते बोलत होते,शिरोळ तालुक्यातील संभाव्य महापूराशी मुकाबला करण्यासाठी शासन कटीबद्ध असून पूर बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी भयभीत न होता शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि सर्वांनीच सतर्क राहावे असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यावेळी म्हणाले, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, भाजपा युवा मोर्चा ग्रामिण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव,प्रांताधिक...

तलाठीची नियुक्ती करुन महापुरात होणारे आंदोलन थांबवा

इमेज
  भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे तहसिलदारांना निवेदन हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड येथे गेल्या अनेक महिन्यापासून तलाठी आणि कोतवाल नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असून हेरवाड मधील सामाजिक कार्यकर्ते व नागरीक महापुराच्या पाण्यात जावून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे तातडीने हेरवाड गावाला तलाठीची नियुक्ती करुन सदरचे आंदोलन थांबवण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या वतीने नूतन तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले. निवेनात म्हटले आहे की, शासनाला अपेक्षित असणार्‍या सुशासनाचे आपल्याकडून अपेक्षा आहे. हेरवाड गावाला कायमस्वरुपी तलाठी व कोतवाल मिळावे, यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते, नागरीक महापुराच्या पाण्यात जावून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हेरवाडसाठी तलाठी व कोतवाल मागणीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार मागणी देखील करण्यात आली आहे. या मागणीस प्रतिसाद न मिळाल्यामुळे गावातील नागरीकांनी महापुराच्या पाण्यात जावून आंदोलन करण्याचा इशारा दिला असून तातडीने हेरवाड गावासाठी तलाठी आणि कोतवाल देवून सदरचे आंदोलन थांबविण्यात...

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक बोरगांववाडीचा ऐतिहासिक मोहरम..!

इमेज
लिंगायत वस्तीच्या गावात शेकडो वर्षाची परंपरा कायम अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :           बोरगांववाडी हे निपाणी तालुक्यातील धार्मिक-संस्कृती जोपासणारे एक छोटेशे गांव आहे.संपूर्ण गांव हे लिंगायत समाजाचे आहे.पण आश्चर्य असं की,याठिकाणी संपूर्ण गावात एकही मुस्लिम बांधव वास्तव्यास नाही.तरीपण इतरत्र केवळ मुस्लिम समाज साजरा करणारा हा मोहरम सण बोरगांववाडी गांवचे लिंगायत धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात.त्यामुळे हा मोहरम सण 24 जुलै ते 29 जुलै अखेर मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. त्यानिमित्त...              बोरगांववाडी हे एक सीमाभागातील दोन हजार लोक वस्तीचे गांव आहे.गावात वारकरी सांप्रदाया बरोबर अध्यात्मिक क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या अधिक आहे.गांव जरी कर्नाटकात असले तरी गावची बोली भाषा मराठी आहे.केवळ भक्ती आणि अमाप श्रद्धा याच्या जोरावर जवळपास पाचशे वर्षापासून परंपरागत मोहरम सण गुण्या गोविंदाने मोठ्या थाटात संपन्न होतो.त्यामुळे बोरगांववाडीचा मोहरम म्हणजे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात आदर्शवत मानला जात असून कर्नाटक-महारा...

चांद शिरदवाड उपाध्यक्ष शितल लडगे यांचा भाजप कमिटी कडून सत्कार

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :   चांद शिरदवाड या.निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्ष पदी भाजपाचे शितल लडगे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्या बद्दल शिरदवाड भाजप कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी प्रथमतः उपस्थितांचे स्वागत संजय पाटील यांनी केल्या नंतर शितल लडगे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य आण्णा पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपाध्यक्ष शितल लडगे म्हणाले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले सदस्य व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायती मध्ये काम करण्याची संधी मिळाली. विद्यमान अध्यक्षांचा कार्य काळ संपल्यानंतर पुढच्या दोन टप्प्यांत आपल्या भाजपा गटाला अध्यक्ष पदांची संधी मिळणार आहे.जोल्ले दाम्पत्याच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.      यावेळी जावेद मुजावर, नारायण हिरवे, सुभाष पाटील ,अमर कांबळे, अजित तोडकर, विश्वास नलवडे, संजय पानमळे, अमोल बन्ने, सचिन पुजारी,दिग्विजय इंगळे, सुनील पाटील, रविंद्र स्वामी, दस्तगीर मुजावर, सचिन पडलिहाळे,महावीर लडगे, अमित परकाळे किरण पडलिहाळे...

शिरोळ तालुक्यातील 'या' १८ शाळांना उद्यापासून सुट्टी

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  कोल्हापूर  जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होत आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले असून जिल्ह्यातील पूर प्रवर्तन क्षेत्रातील २८ गावांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सदर शाळांना निवारा कक्ष म्हणून वापरण्यात येणार आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यातील १८ शाळांना उद्यापासून सुट्टी जाहिर करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे - अब्दुलललाट, शिरोळ, कुरुंदवाड, धरणगुत्ती, नांदणी, हेरवाड, तेरवाड, शिरदवाड, टाकवडे, नृसिंहवाडी, राजापूर, खिद्रापूर, गणेशवाडी, मजरेवाडी, गौरवाड, औरवाड, बुबनाळ, आलास या गावातील शाळांचा समावेश आहे.

शिरोळ तालुक्यातील 'या'१८ शाळांना उद्यापासून सुट्टी..!

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होत आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले असून जिल्ह्यातील पूर प्रवर्तन क्षेत्रातील २८ गावांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली. संभाव्य पूर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सदर शाळांना निवारा कक्ष म्हणून वापरण्यात येणार आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यातील १८ शाळांना उद्यापासून सुट्टी जाहिर करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे - अब्दुलललाट, शिरोळ, कुरुंदवाड, धरणगुत्ती, नांदणी, हेरवाड, तेरवाड, शिरदवाड, टाकवडे, नृसिंहवाडी, राजापूर, खिद्रापूर, गणेशवाडी, मजरेवाडी, गौरवाड, औरवाड, बुबनाळ, आलास या गावातील शाळांचा समावेश आहे.

महापूराच्या पार्श्वभूमिवर 28 गावातील शाळांना सुट्टी जाहीर

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : कोल्हापुरात पुराचा धोका निर्माण झाला असून पूरग्रस्त भागातील 28 गावातील शाळांना उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.शाळांचा वापर पूरग्रस्त छावण्यासाठी करण्यात येणार आहे. तसंच पाणी वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.पूरग्रस्त २८ गावातील शाळांना  सुट्टी देण्यात आली आहे. शाळांना देण्यात आलेली सुट्टी पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे असंही प्रशासनाने सांगितलं आहे.

पंचगंगेने धोकापातळी ओलांडण्याआधी नागरिकांनी स्थलांतर करावे :

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 90 टक्के, कासारी व कुंभी धरण 80 टक्के भरले आहे. सद्या पंचगंगेत 60 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. जर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला तर पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे पंचगंगा नदीने धोकापातळी ओलांडण्याआधी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले. त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली, इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ, आंबेवाडी, प्रयाग चिखली भागातील पूरबाधित क्षेत्राचा व संभाव्य पूरस्थिती निर्माण होणाऱ्या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रशासनाने सुरु केलेल्या निवारागृह, जनावरांसाठीची सोय तसेच नदीची पाणीपातळी याबाबत पाहणी केली. यावेळी उपस्थित गावातील नागरिक, प्रशासनातील अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेवून गरजूंना तातडीने मदत करण्यासाठी सूचना केल्या. या भेटीवेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच श...

मिलिंद कांबळे यांनी पत्नीचा पुण्यस्मरण दिवस साजरा केला जानकी वृध्दाश्रमात

इमेज
  घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : श्री दत्त साखर कारखान्याचे कर्मचारी मिलींद कांबळे यांनी पत्नीचा पुण्यस्मरण दिवस जानकी वृद्धाश्रम घोसरवाड येथे केला साजरा.       आदरणीय गणपतराव दादा पाटील यांच्या विचारांनी प्रभावित होऊन श्री दत्त साखर कारखान्याचे कर्मचारी मिलींद कांबळे यांनी आपल्या स्वर्गीय पत्नीचा पुण्यस्मरण दिवस जानकी वृद्धाश्रम,घोसरवाड येथे साजरा केला.वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध,जेष्ठ,लहान -थोर यांना अन्नदान केले.             सा.रे.पाटील साहेबांच्या प्रेरणेने आणि आदरणीय गणपतराव दादांच्या विचारांनी ही सामाजिक बांधिलकी जपली आहे.त्यांच्या हा उपक्रम समाजाला एक दिशादर्शक ठरेल.अशा समाजोपयोगी कार्याची आज खरोखरच आवश्यकता आहे.      यावेळी मिलींद कांबळे यांचा सर्व परिवार,जानकी वृद्धाश्रम घोसरवाडचे बाबासाहेब पुजारी, नाना कदम,विजय वाणी आणि शेखर कलगी हे उपस्थित होते.

खासदार धैर्यशील मानेंच्या प्रयत्नाला यश : हातकणंगले रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारच्या `अमृत भारत स्टेशन योजने`तंर्गत हातकणंगले रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच या रेल्वेस्थानकावर विविध विकासकामे केली जाणार आहेत. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. या स्थानकांसाठी कोट्यावधी रुपयांची प्रस्तावित कामे केली जाणार आहेत. हातकणंगले रेल्वे स्थानक आदर्श रेल्वे स्थानक बनणार आहे.   प्रवाशांची गैरसोय होत असल्याची विशेष बाब निदर्शनास आणली होती. आदर्श रेल्वे स्थानक होण्यासाठी महत्वाचे मुद्दे आणि विशेष कामे करावीत, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार रेल्वेच्या एका समितीने या मागणी तातडीने दखल घेऊन रेल्वेस्थानकात विविध विकासकामे करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतंर्गत प्रतीक्षा कक्ष आणि प्रसाधनगृहाची व्यवस्था, प्रशिक्षक (बोगी) इंडिकेटरची तरतूद केली जाणार आहे. हातकणंगले बसस्थानकात बसेसच्या वाहतुकीसाठी पुरेशी जागा नाही, ही मागणी लक्षात घेऊन स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी जिथे दोन रस्ते मिळतात त्या ठिकाणी प्रवेशद्वार करण्याचा निर्णय घेतला जाईल...

शिरोळ तालुका मराठा मंडळ सांस्कृतिक भवन युवापिढीसाठी उत्कर्ष आणि उन्नतीचे द्वार खुले करणार : खासदार धैर्यशील माने

इमेज
  पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ, 20 लाख रुपयांच निधी जयसिंगपूर येथे शिरोळ तालुका मराठा मंडळ सांस्कृतिक भवन प्रांगणात पेव्हिंग ब्लॉक शुभारंभप्रसंगी खासदार धैर्यशील माने शेजारी आदित्य पाटील यड्रावकर व मान्यवर. (छाया राहुल मोरे जयसिंगपूर) जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर येथील शिरोळ तालुका मराठा मंडळ सांस्कृतिक भवन हे सर्व समाजातील युवापिढीसाठी उत्कर्ष आणि उन्नतीचे द्वार खुले करणारे प्रेरणादायी ठरेल, असा आशावाद हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. तसेच इमारतीच्या छताचे बांधकाम, पोओपी, लाईट साऊंड सिस्टीम अशा कामासाठी आणखीन 25 लाख रुपयेचा निधी देण्याचे अभिवचन दिले. शिरोळ तालुका मराठा मंडळ सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात बुधवारी खासदार धैर्यशील माने व युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पेव्हिंग ब्लॉक बसवणे कामाचा शुभारंभ करण्यात आला. खासदार माने म्हाणाले, या कामासाठी खासदार फंडातून 20 लाख रुपयेची निधी मंजूर झाला होता. शहरात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. गावांतर्गत कामासा...

कौतुकामधून काम करण्याची प्रेरणा मिळते : गटशिक्षणाधिकारी भारती कोळी

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : कन्या विद्या मंदिर दत्तनगर शिरोळ येथील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कु.श्रावणी मनोज मक्ते ही जिल्हा शिष्यवृत्ती धारक झालेने मार्गदर्शक शिक्षिका अस्मिता राजाराम सुतार यांचा सत्कार शिरोळच्या गटशिक्षणाधिकारी भारती कोळी यांनी केला.              सत्कारप्रसंगी बोलताना गट शिक्षणाधिकारी भारती कोळी म्हणाल्या की, शिष्यवृत्तीच्या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी वर्षभर मेहनत करतात.त्यांना प्रोत्साहन देवून कौतुक करणे गरजेचे आहे.कारण कौतुकामधूनच काम करण्याची प्रेरणा मिळत असते.               याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी-अनिल ओमासे साहेब,उर्दू केंद्रप्रमुख रियाज चौगुले,शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता घोरपडे, राजाराम सुतार यांच्यासह अध्यापक वृंद उपस्थित होते.

शिरोळ तालुक्यातील रस्ते व पूल बांधणीसाठी ३४ कोटीचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील विविध विकास कामांसाठीच्या पुरवणी मागण्याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करण्यात आला, यामध्ये शिरोळ तालुक्यातील वेगवेगळ्या राज्य, जिल्हा व ग्रामीण मार्गांसाठी २५ कोटी रुपये तर पंचगंगा नदीच्या ओतावरील मजरेवाडी ते बस्तवाड मार्गातील ओढ्यावर नाबार्डच्या माध्यमातून ९ कोटी खर्चाच्या पूल उभारणीसाठी निधी मंजूर झाला आहे असे सांगताना शिरोळ तालुक्यासाठी एकूण ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे, शिरोळ तालुक्यातील राज्य, जिल्हा व ग्रामीण मार्ग रस्त्यांसाठी व पंचगंगा नदीच्या ओतावरील ओढ्यावर पूल बांधण्यासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर व्हावा यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, आपल्या या मागणीला निधी मंजूर झाल्या असल्यामुळे यश आल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटले आहे, हा निधी मंजूर होण्याकामी महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री नामदार एक...

किसान सन्मान निधीची तातडीने वाटप करा : स्वाभिमानीचे तहसीलदारांना निवेदन

इमेज
  सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :             सध्या सर्वत्र पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आशा अवस्थेत शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीपासून वंचित न ठेवता तातडीने वाटप व्हावे, या मागणीचे निवेदन स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले.                निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीद्वारे केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना २ हजार रुपये निधी दिला जातो. असे वर्षाला १२ हजार रुपये दिले जातात. शासनाने १०० टक्के केवायसी दिल्याशिवाय किसान सन्मान निधी वर्ग करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे,त्या शेतकऱ्यांना सन्मान निधीचे पैसे मिळण्यास कोणतीही अडचण नसावी.मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना केवायसी पूर्ण करण्यास सांगून उर्वरित शेतकऱ्यांना निधी न देता पिळवणूक करणे चुकीचे आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान निध...

अथर्व रजनीकांत डोणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत दहावा

इमेज
कुंभोज / शिवार न्यूज नेटवर्क : केंद्रीय प्राथमिक शाळा नं.६२ कुंभोज ता.हातकणंगले या शाळेचा विद्यार्थी कु.अथर्व रजनीकांत डोणे इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण राज्य गुणवत्ता यादीत १० वा आला.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.           अथर्वला त्याचे वर्गशिक्षक माणिक भूपाल कागवाडे, व वडील रजनीकांत डोणे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तर मुख्याध्यापक प्रकाश बंडू माळी व सहकारी शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले.

सहकारभूषण एस. के .पाटील महाविद्यालय कुरुंदवाड मध्ये 11 वी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

इमेज
  कुरूदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  सहकारभूषण एस. के .पाटील महाविद्यालयात 11कला /वाणिज्य आणि विज्ञान वर्गाचा स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या  मुख्याध्यापीका श्रीमती आर . आर. निर्मळे उपस्थित होत्या ,कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाची प्रभारी प्राचार्य डॉ. आर एस कदम त्याचबरोबर महाविद्यालयाचे जूनियर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.आर एस सावगावे, अधीक्षक बिडकर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.       सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत गायकवाड यांनी केले .तर प्रास्ताविक साठे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी जीवन जगत असताना येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर कसे सामोरे जावे, समाजामध्ये अशी विविध उदाहरणे आहेत की आपल्या परिस्थितीवर कारणे न सांगता मात करून यश संपादन केले आहे अशा स्वरूपाची विविध उदाहरणे त्यांनी देऊन त्याबद्दल मार्गदर्शन केले.      चंद्रयान-३ च्या यशस्वी उड्डाण व त्यामागील उद्देश व भारतीय खगोल शास्त्रज्ञांच्या बद्दल माहिती पाटोळे सरांनी दिली...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजीनियरिंग सहा विध्यार्थ्यांना अँप्टिव्ह कंपनीकडून ५.७० लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज

इमेज
कोल्हापूर / शिवार  न्यूज नेटवर्क :  संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनीरिंगचा वीरेंद्र भोसले, यश भागवत, सतेज पाटील, इंद्रजीत लोहार आणि इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचा विभागाची तन्मयी कुलकर्णी, ऋषिकेश महाजन या विद्यार्थ्याची "अँप्टिव्ह कॉम्पोनन्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,पुणे" ५.७० लाख रूपये वार्षिक पॅकेज तसेच कु.मेहरूण मुल्ला या विद्यार्थीनीची 3.75 लाख रुपये वार्षिक पॅकेज देऊन 'स्नायडर इलेक्ट्रिक, मुंबई' या कंपनीने निवड केली आहे. दरवर्षी संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल अंतर्गत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. कंपन्याचे अधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांची अभ्यासातील तयारीचे मूल्यमापन, नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. 'अँप्टिव्ह कॉम्पोनन्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे' आणि स्नायडर इलेक्ट्रिक, मुंबई' या दोन्ही कंपन्या प्रख्यात असून भारतभर तसेच विविध देशात या कंपनीच्या अने...

डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे विद्यार्थी संतोष कदम भारतात टॉप १% मध्ये

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट या विभागामध्ये  पीएचडी शिक्षण घेत असलेले संतोष आबासो कदम यांनी एनपीटीईएल या ऑनलाइन सर्टिफिकेशन प्रोग्रॅममधील इंटरनॅशनल मार्केटिंग या कोर्समध्ये ९३% गुण प्राप्त  करून भारतामध्ये टॉप १% गुणवंतांमध्ये स्थान मिळविले आहे. डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ के प्रथापन यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कदम हे पीएचडी शिक्षण घेत आहेत. क्रेडिट नियमावलीनुसार संशोधक मार्गदर्शकाने पीएचडी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला ऑनलाईन एनपीटीईएल किंवा मुक कोर्सेस सूचित करावयाचे असतात.  यामध्ये कुलगुरू प्रोफेसर डॉ के प्रथापन यांनी सुचित केलेल्या इंटरनॅशनल मार्केटिंग या एनपीटीईएल कोर्समध्ये संतोष कदम यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराजमंत्री आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार मा.ऋतुराज पाटील, कुलसचिव डॉ जयेंद्र खोत यांनी संशोधक विद्यार्थी संतोष कदम, संशोधन मार्गदर्शक कुलगुरू प्रोफेसर डॉ के प्रथापन यांचे अभिनंद...

मुनीश्री आचार्य कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्ये निषेधार्थ उद्या बोरगाव बंदची हाक

इमेज
    अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : हिरेकुडी येथील प.पू. 108 मुनीश्री आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आले आहे. या हत्येचा निषेधार्थ मंगळवार दि 11 जुलै जाहीर निषेध करण्यात येणार असून यासाठी या दिवशी बोरगाव बंदची हाक देण्यात आली आहे.  संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढून स्वामीजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.यासाठी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी, संघ, संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी एक दिवशीय बोरगाव बंद पाळावे. व उद्या सकाळी 9 वाजता जय शिवराय स्टेज जवळ सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सैनिकी पॅटर्न निवासी शाळेचे राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेली पिढी घडवण्याचे कार्य कौतुकास्पद : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपादजी नाईक

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :  शिक्षण प्रसारक मंडळ आपल्या विविध शाळांच्या माध्यमातून गेली ९८ वर्षे अव्याहतपणे सुसंस्कृत पिढी घडवण्याचे कार्य करीत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. संस्थेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून संस्थेने सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेली पिढी घडवण्याचे शिवधनुष्य समर्थपणे पेलले आहे. या शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्यास मी कटीबद्ध आहे असे उद्गार केंद्रीय पर्यटन, बंदरे, जहाज व जलवाहतूक राज्यमंत्री मा. ना. श्रीपादजी नाईक साहेब यांनी काढले.   येथील शिक्षण प्रसारक मंडळ, कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी प्रशालेस ना. नाईक यांनी सदिच्छा भेट देत प्रशालेच्या बाल सैनिकांनी दिलेल्या मानवंदनेचा स्वीकार केला.   या वेळी नामदार नाईक साहेब यांचा सत्कार संस्थेचे आधारस्तंभ व नृसिंहवाडी येथील श्री दत्त देवस्थानचे माजी अध्यक्ष दिगंबर शंकर उर्फ पप्पा पुजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. संस्थेचे चेअरमन प्रा. शरद पराडकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथील पंचगंगा नागरी सहकारी बँकेचे संचालक. दिगंबर जोशी (काका ) तसेच मा. डॉ. ग...

जैन मुनिंच्या हत्येच्या निषेधार्थ दक्षिण भारत जैन सभेकडून जाहीर निषेध

इमेज
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : हिरेकुडी तालुका चिकोडी येथील परमपूज्य 108 मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आले. या हत्येचा जाहीर निषेध दक्षिण भारत जैन सभेकडून करण्यात आले असून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सभेकडून करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, श्रावकरत्न रावसाहेब पाटील यांनी दिली. आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले, साधू साधविंच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे .आपल्या सभेकडून यापूर्वी वेळोवेळी साधूंच्या सुरक्षितेबाबत सरकारला निवेदन ही दिले आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने साधूंच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. हिरेकुडी गावाच्या नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनि आचार्य श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येने संपूर्ण जैन समाज दुखी झाला आहे. अहिंसेला प्राधान्य देणारा जैन समाज संपूर्ण मानव जातीला आदर्शवत आहे .अशा पवित्र जैन धर्मांच्या मुनिंच्या हत्या झाल्याने संपूर्ण जैन समाजामध्ये तीव्र आक्रोश असून ...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजिनिअरिंगची उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. विविध विभागातून वेगवेगळ्या विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत १०० पैकी १०० गुण मिळवून, विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान याहीवर्षी पटकाविला आहे, या परीक्षेमध्ये विविध विभागातील मिळून एकूण ३० विद्यार्थ्यांनी ९०% हुन अधिक टक्केवारी मिळवून यश संपादन केले आहे. १०० पैकी १०० गुण मिळवून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातुन तृतीय वर्षातील ऑप्टिकल नेटवर्क अँड सॅटेलाईट कम्युनिकेशन या विषयात कु. प्रतिक अंगडी, कॉम्प्युटर सायन्स विभागातुन द्वितीय वर्षातील मायक्रोप्रोसेसर या विषयात कु. अमुल्या चौगुले व कु. सलोनी भंडारी, डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग या विषयात कु.रिया करुणा, सिव्हिल विभागातुन द्वितीय वर्षातुन हायड्रॉलिक्स या विषयात अर्घ्य कोळेकर, प्रथम वर्ष कॉम्प्युटर सायन्स विभागातुन कु. अनन्या मोर्ती, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातुन कु. क्षितीजा मुसळे व...

घोडावत विद्यापीठास केंद्र सरकारकडून संशोधनासाठी विशेष अनुदान

इमेज
  संशोधनासाठी अनुदान प्राप्त झाल्याबद्दल विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते प्रा.डॉ.तिवारी आणि प्रा.डॉ.पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून विद्यार्थी कल्याण मंडळाचे डीन प्रा.चेतन पाटील, संशोधक डीन डॉ.सावंत, डॉ.तिवारी,उजवीकडून शैक्षणिक डीन डॉ. कुलकर्णी, कुलसचिव डॉ.कायंदे व डॉ. संभाजी पवार. जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संजय घोडावत विद्यापीठास विज्ञान विषयातील संशोधनासाठी साठ लाख रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे.येथील प्रा.डॉ.संभाजी पवार, प्रा.डॉ के.एन तिवारी यांनी हा संशोधन प्रकल्प केंद्र सरकारला सादर केला होता.       डॉ.पवार यांच्या प्रकल्पामध्ये वातावरणीय बदलांवर परिणाम करणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइड या वायूचे उपयोगी रसायनामध्ये परिवर्तन करण्यासाठी संशोधन केले जाणार आहे. तर डॉ.तिवारी यांच्या संशोधन प्रकल्पाचा उद्देश लहान सल्फर आधारित सिंथेटिक रेणू विकसित करणे हा आहे. ज्याचा उपयोग संसर्गजन्य क्षय रोगाच्या उपचारासाठीच्या औषध निर्मितीला चालना देणारा ठरेल.            भारतीय 8 हजा...

पाणीपट्टीत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानीशी संपर्क साधावा : बंडू पाटील

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाने हेरवाड, शिरढोण आणि तेरवाड या गावासाठी एका निवृत्त अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. हा अधिकारी शेतकऱ्यांच्या कडून पैसे वसूल केला मात्र पाटबंधारे विभागाला पैसे भरला नाही आणि पावतीही दिला नसल्याचे समोर आले असून ज्या - ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष बंडू पाटील यांनी केले आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने पाणी उपसा केल्याच्या बदलात शेतकऱ्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. शेती पिकावर ही पाणीपट्टी अवलंबून असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांची वेगवेगळी पाणीपट्टी आकारली जाते. यावर्षी पाणीपट्टी वसुल करण्यासाठी तुकाराम वाडेकर या निवृत्त पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याची मार्च अखेर पर्यंत तात्पुरती नियुक्ती करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागातून समजते, मात्र सदरच्या निवृत्त अधिकाऱ्याने हेरवाड, शिरढोण आणि तेरवाड मधील शेतकऱ्यांच्याकडून मार्चनंतरही सुमारे दोन लाख रुपये पाणीपट्टी गोळा केल्याची चर्चा सुरू असून मार्च नंतर त्यांनी फक्त तीनच पावत्या क...

शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत? वाचा संपूर्ण यादी

इमेज
मुंबई / वृत्तसेवा :  बंडखोरीनंतर अजित पवार आपल्याला 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत आहेत. त्याचवेळी शरद पवार यांनाही किती आमदारांचा पाठिंबा आहे हे सांगता येत नाही. काही आमदार असे आहेत की त्यांना कोणत्या मार्गाने जायचे हे ठरवता आलेले नाही. अजित पवार यांचे समर्थक (२४) छगन भुजबळ, दिलीप वासले पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम, सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, दत्ता भरणे, बबन दादा शिंदे, दीपक चव्हाण, राजेंद्र कोरेमारे, नितीन पवार, संग्राम पवार, डॉ., राजेश पाटील, सुनील शेळके, दिलीप मोहिते, अतुल बेनके, इंद्रनील नाईक, शेखर निकम, यशवंत माने. आदी. शरद पवार समर्थक (१३) जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे, अनिल देशमुख, संदीप क्षीरसागर, सुमनताई पाटील, सुनील भुसारा, राजेंद्र शिंगे, मानसिंग नाईक. जे अद्याप कोणत्याही गटात नाहीत (15) चंद्रकांत नवघरे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, आशुतोष काळे, प्रकाश सोळंकी, बाळासाहेब आजबे, बाळासाहेब पाटील, किरण लहामटे, नीलेश लंके, दौलत दर...

महावीर कांबळे यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान : चेअरमन रावसाहेब पाटील

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : साने गुरुजी शिक्षण संस्था कुरुंदवाड संचलित साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड मधील सहाय्यक शिक्षक महावीर शंकर कांबळे यांनी संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये सात जुलै 1983 रोजी सुरुवात केली.त्यांनी संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ तसेच हेरवाड हायस्कूल हेरवाड या तीन शाखेमध्ये एकूण 40 वर्षे सेवा केली त्याप्रित्यर्थ शाळेने त्यांचा यथोचित सत्कार केला. प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित पाटील,संचालक सतिश पोतदार,संदीप आवटी,राजू आलासे,मुख्याध्यापक -ललिता निर्मळे,माणिक नागावे,यादव मॅडम,श्रेणिक डिग्रजे,शिक्षक उपस्थित होते.           प्रारंभी ललिता निर्मळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महावीर कांबळे सरांचे शाळेविषयी असलेले योगदान त्यांनी स्पष्ट केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कांबळे सरांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.न्यू इंग्लिश शेडशाळचे मुख्याध्यापक श्रेणिक डिग्रजे यांनी मनोगत व्यक्त करत असताना ते एक उत्तम शिक्षक, सांस्कृतिक,बौद्धिक,शै...

कुमार घोसरवाड शाळेत गुरुपौर्णिमा समारंभ संपन्न

इमेज
  घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कुमार विद्यामंदिर घोसरवाड शाळेत पाद्यपूजनाचे महत्त्व भारतीय संस्कृतीत कशाप्रकारे सांगितले आहे त्याविषयी विविध उदाहरणे देऊन साधू,संत, ऋषीमुनी यांच्यामधील गुरु शिष्यांचे महत्त्व समजावून दिले. तसेच आजच्या काळातील भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,संत कबीर,संत तुकाराम यांच्या प्रति असलेले गुरु शिष्याचे नाते व त्यांचे श्रेष्ठत्व व त्यांचे कार्य हे सुद्धा या देशाला मिळालेली गुरुदक्षिणाच आहे. हे समजावून देऊन आजच्या पिढीला गुरूंचे महत्त्व समजले पाहिजे.त्यांचे आचार,विचार आपण जोपासले पाहिजे.त्यांची शिकवण,त्यांचे महात्म्य समजून घेऊन जीवनात वाटचाल केली पाहिजे.त्यांचे गुण अंगीकारले पाहिजे. मोठ्यांचा आदर केला पाहिजे. आई-वडिलांची सेवा केली पाहिजे.आई वडिलांचे महत्व ओळखले पाहिजे व त्यानुसार आपण जीवन जगलो तरच खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेला महत्व आहे.हे शामराव कांबळे यांनी सांगितले.यानंतर आई व वडील यांच्या जीवनावरील गीत कमते मॅडम यांनी गायन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या...

सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

इमेज
  पुणे / वृत्तसेवा - राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच पुढचे काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, पुणे , सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवडाभर पुणे शहरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात ५ जुलै रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांना ३, ४, ५ जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हरोली येथे रविवारपासून पार्श्वनाथ दिगंबर मंदिरात चातुर्मास

इमेज
हरोली / शिवार न्यूज नेटवर्क :  हरोली (ता. शिरोळ) येथील १०८ पार्श्वनाथ दिगंबर जिन मंदिरात रविवारी (दि.२) चातुर्मास स्थापना होणार आहे. तसेच सोमवारी (दि.३) गुरूपौर्णिमेनिमित्त दुपारी २ वाजता गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम होणार आहे. हरोली येथे २९ जूनरोजी श्री १००८ आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांचे परमप्रभावक शिष्य निर्यापक श्रमण श्री १०८ नियमसागर महाराज यांचे ससंघ आगमन झाले होते. गेले २ महिने नियमसागर महाराज आणि संघ यांचा चातुर्मास कुठे होणार याची उत्सुकता संपूर्ण दिगंबर जैन समाजात होती. अखेरीस हरोली येथे चातुर्मास होणार असल्याचे ठरले. चातुर्मासानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातून धार्मिक प्रबोधन तसेच प्रभावणा होते. म्हणून श्रावकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन हरोली दिगंबर जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्या जाधवला उपविजेतेपद

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : अतिग्रे  येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता १० वी च्या वर्गात शिकत असणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव हिला थायलंड या देशातील नोंतबुरी या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर टेनिस जे ६० या स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. सदर स्पर्धा १९ जून ते २४ जून दरम्यान झाल्या. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन यांच्या मार्फत स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धा थायलंड या देशात पार पडल्या.        १८ वर्षाच्या आतील मुलींच्या गटात ज्युनिअर टेनिस जे ६० डबल या स्पर्धेत ऐश्वर्या जाधव व प्रिशा शिंदे या उपविजेत्या ठरल्या. अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. या सामन्यात उपविजेतेपद प्राप्त करत ऐश्वर्याने भारत देशाचे व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले. विम्बल्डन खेळाडू, कोल्हापूरची कन्या ऐश्वर्या जाधव हिचे टेनिस खेळावरील प्रभुत्त्व वाखाणण्याजोगे आहे. तिने यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. अध्यक्ष श्री संजय घोडावत , विश्वस्त श्री. विनायक भोसले, संचालिका-प्राचार्या...