सिंगल फेज वरील लोडशेडिंग बंद झाल्यामुळे दिलासा मिळेल : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यासह सर्वच ठिकाणी नदी काठावरील मळी भागात अथवा मळ्यातील वस्त्यांवर लोड शेडिंग मुळे सिंगल फेज होण्याचे प्रमाण वाढले होते, यामुळे वस्त्यांवर असलेल्या घराघरात रात्री अपरात्री वीज जाण्याचे प्रमाण वाढले होते, याचा फटका ज्येष्ठ नागरिक, शेतकरी,महिला भगिनी व शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत होता, या लोड शेडिंगबाबत अनेक भागातून तक्रारी येत होत्या,या संदर्भात महावितरण कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. कावळे यांच्याशी व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण सातत्याने संपर्कात होतो, कोल्हापूर जिल्हा हा महावितरण कंपनीला सर्वाधिक उत्पन्न देणारा परिसर आहे,या भागात महावितरणच्या थकबाकीचे प्रमाण देखील अत्यल्प आहे त्यामुळे या भागातील ग्राहक व शेतकऱ्यांच्या शेती पंपाना नियमित वीज पुरवठा करावा अशा सूचना दिल्या होत्या,तांत्रिक अडचणी, महावितरण कडील जनरेटर रिपेरीची सुरू असलेली कामे, धरणे पूर्ण क्षमतेने भरली नसल्यामुळे वीज निर्मिती वर झालेला परिणाम, पावसाने ओढ दिल्यामुळे शिरोळ हातकणंगले तालुक्यात वाढलेली विजेची मागणी यामुळे लोड शेडिंग चा प्रश्न...