पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संजय घोडावत स्कूलच्या बालचमूनी स्वच्छतेचा संदेश देत साजरी केली गांधी जयंती

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपला परिसर, शाळा, मंदिरे आणि सार्वजनिक सुविधांची सर्व ठिकाणे स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच भाग म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या केजी विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात महात्मा गांधी जयंती साजरी केली. यावेळी केजी भागातील सर्व विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील बागबगीच्या स्वच्छ केला.  या कार्यक्रमात बोलताना संचालिका प्राचार्या श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या, विद्यार्थ्यांना बालवयात चांगल्या स्वच्छतेच्या सवयी लागणे गरजेचे आहे, आपल्या देशाविषयी प्रेम त्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे. महात्मा गांधीजी च्या काही गोष्टी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या.   यावेळी मुख्याध्यापिका लॉरेन डिमेलो यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुलांना संबोधित केले. निवंश तनेजा हा विद्यार्थी गांधीजींची वेषभूषा केला होता.  अरमान जमादार, श्लोक कुलकर्णी आणि सौम्या माळी या तीन विद्यार्थ्यांनी गांधीजी आणि त्यांचे जीवन आणि तत्त...

सहकारी सेवा संस्थांना उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे : विराजसिंह यादव

इमेज
  दिनबंधू कै दिनकररावजी यादव विकास संस्था व दूध संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  अपात्र कर्जमाफी प्रकरणामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या सहकारी विकास सेवा संस्था आर्थिक संकटात सापडल्या याला शासनाचे धोरण कारणीभूत आहे या अपात्र कर्जमाफीतील सोसायटीकडून बँकांनी कर्ज वसूल करून पण शेतकऱ्यांकडून सोसायटीकडे कर्जाची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल झाली नाही व शासनाने ती करून दिली नाही याचा आर्थिक फटका सहकारी संस्थांना बसला या अडचणीत असलेल्या सहकारी विकास सोसायटींना उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन अनुदान द्यावे अशी मागणी दिनबंधू दिनकररावजी यादव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन व दूध संस्थेचे चेअरमन विराजसिंह यादव यांनी केली. येथील दिनबंधू कै दिनकररावजी यादव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था व दिनबंधू कै दिनकररावजी यादव दूध व्यवसायिक सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते सभासदांनी दोन्ही संस्थेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि दोन्ही सं...

बोरगाव येथील श्री अरिहंत मल्टीस्टेट संस्थेची निवडणूक बिनविरोध

इमेज
  सहकार रत्न, रावसाहेब पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष म्हणून खडकलाटचे सतीश पाटील यांची निवड अजित कांबळे/ शिवार न्यूज नेटवर्क:     कर्नाटक राज्यसह आता महाराष्ट्र राज्यातही पदार्पण करीत सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असलेल्या बोरगाव येथील श्री अरिहंत को ऑप क्रेडिट सोसायटी (मल्टीस्टेट)या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्ष म्हणून रावसाहेब पाटील व उपाध्यक्ष म्हणून सतीश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी,बेळगाव प्रांतचे सहकार संयुक्त निबंधक डॉ. सुरेशगौडा यांनी केले.            पंचवार्षिक निवडणुकीत निवड झालेल्या संचालकांपैकी अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष म्हणून सतीश पाटील ,व संचालक म्हणून अभिनंदन पाटील, सुभाष शेट्टी,अभय करोले,जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील,भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे,बाबासाहेब आपराज, श्रीकांत वसवाडे,सौ. अनिता मगदुम ,निर्मला बल्लोळे, संदीप पाटील, शिवानंद राजमाने,अजित कांबळे यांचा समावेश आहे. याप्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष रावसाह...

अल्पावधीत१७ टक्के लाभांश देणारी स्ट्रॉंग पतसंस्था म्हणून शिवाजी पतसंस्थेने केलेलं काम नावलौकिक वाढविणारे आहे".- चंद्रकांत वाघमारे

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : छत्रपती शिवाजी शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेने अवघ्या दहा वर्षात केलेली सर्वंकष प्रगती व सभासदांच्या साठी दिलेल्या सोयी- सुविधा पाहता संस्थेने शिक्षकांच्यातील एक स्ट्रॉंग पतसंस्था म्हणून केलेला नावलौकिक कौतुकास्पद आहे.असे उद्गार पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी काढले.ते पुढे म्हणाले सेवानिवृत्तांना रुपये ३लाख कर्ज व सभासदांनी संगणक साक्षर व्हावे.यासाठी बिनव्याजी लॅपटॉप साठी दिलेले कर्ज.या योजना म्हणजे सेवानिवृत्तांना दिलासा व सेवेतील सभासदांना उन्नतीसाठी दिलेली शाबासकी आहे.याबद्दल संस्थापक चेअरमन एस.व्ही. पाटील व संचालक मंडळाला मन:पुर्वक धन्यवाद देतो. छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेने दशकपुर्ती सभेच्या निमित्ताने आयोजित विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक व सेवानिवृत शिक्षकांच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.        यावेळी चंद्रकांत वाघमारे व त्यांच्या सुविध्य पत्नी ललिता वाघमारे यांचा सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.          यावेळी बोलताना कर...

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर; राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय

इमेज
मुंबई :  अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन उद्या गुरुवारी पार पडणार आहे. याच दिवस ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे. पण ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचं मुस्लीम समुदयानं जाहीर केलं आहे. त्यामुळं गुरुवार अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत.त्यामुळं गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी, २८ सप्टेंबर होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचं योग्य व्यवस्थापन करणं पोलीस प्रशासनाला शक्य व्हावं म्हणून शुक्रवारी २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.

डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा ''अवॉर्ड ऑफ ऑनर '' पुरस्काराने गौरव

इमेज
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ.के.प्रथापन यांना प्रतिष्ठित जस्ट ऍग्रीकल्चर ग्रुप कडून '' अवॉर्ड ऑफ ऑनर'' पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.   कुलगुरू डॉ.प्रथापन हे डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून सध्या कार्यरत आहेत. एक आदर्श प्राध्यापक ते उत्तम शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या प्रशासनाचा अमीट ठसा उमटविला आहे. डॉ.प्रथापन हे भारत सरकार च्या आयसीएआर, एफडीए, एफएसएसएआय, नॅक , युजीसी व इतर समित्यांवर ते मूल्यमापन अधिकारी म्हणून काम पाहतात.  शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये आयईईई कडून २०२२ साली 'इलाईट अकॅडमिसिएन' यापुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना बेस्ट आंतरराष्ट्रीय रिव्युवर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ते अनेक शासकीय व निमशासकीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्...

सामाजिक कार्यकर्ते डॉ.दगडू माने यांच्या हस्ते संत रोहिदास मंडळाच्या श्रींची आरती

इमेज
  शिरोळ येथे मंडळातर्फे विविध कार्यक्रम : मनोरंजनात्मक सजीव देखावा सादरीकरण  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : येथील श्री संत रोहिदास कला , क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अमाप उत्साहात व भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे . या मंडळातर्फे गणेशोत्सव निमित सोमवारी आयोजित श्रींच्या पूजा - आरती चा सोहळा चर्मकार समाजाचे मार्गदर्शक व अभिनेते डॉ दगडू श्रीपती माने व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता दगडू माने (विशेष कार्यकारी अधिकारी ) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.                येथील अर्जुनवाड रोडवरील श्री संत रोहिदास नगर येथे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे . संत रोहिदास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विनोदी सजीव देखावाही सादर केला आहे. सोमवारी सायंकाळी डॉ.दगडू माने व परिवार यांच्या हस्ते संत रोहिदास मंडळाच्या बाप्पांची आरती व पूजा करण्यात आली .             यावेळी डॉ.दगडू माने यांनी सर्...

ग्रामपंचायत कवठेगुलंद कडून कुमार शाळेस आर.ओ.प्लँट प्रदान

इमेज
कवठेगुलंद / शिवार न्यूज नेटवर्क : ग्रामपंचायत मौजे कवठेगुलंद यांच्याकडून १५ व्या वित्त आयोगातून कुमार विद्या मंदिर कवठेगुलंद (गाव ) या शाळेस कमर्शिअल आर.ओ. प्लँट सरपंच सौ.प्रमिला जगताप यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.        या कमर्शिअल आर.ओ. प्लँटमुळे शालेय विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळेल. शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.असे आश्वासन सरपंच सौ.प्रमिला जगताप यांनी दिले.  या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाबगोंडा पाटील, माजी उपसरपंच शशिकांत शिंदे व शाळेतील शिक्षक -दिपक कदम,मुकुंद कुंभार,चंद्रकांत नवटे,सविता उपाध्ये,वैशाली आवटी,शिलप्रभा माळी,लता कांबळे व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

मानकापूर प्राथमिक कृषी संघाकडून 13% लाभांश जाहीर : अध्यक्ष दादासो पुजारी यांची माहिती

इमेज
  संघाची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :        निपाणी तालुक्यातील मानकापूर कसनाळ व परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या माणकापूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाने गरजवंतांना मदतीचा हात देत आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे चालवीत असून सर्व संचालक मंडळाच्या निर्णयानुसार यंदा सभासदांना 13 टक्के लाभांश देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ दादासो पुजारी यांनी दिली. संघाच्या सभागृहात आयोजित 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना ते म्हणाले, गावातील शेतकरी बांधवांना शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज देण्याबरोबरच तीन टक्के व्याजाने ट्रॅक्टर ,वापरांसाठीही कर्ज योजना ची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या अल्पदरात कीटनाशके वितरण करीत असून संघाच्या वतीने लवकरच खत विभाग ही प्रारंभ करणार आहे .अहवाल वर्ष अखेर संघात एकूण 911 सभासद ,51 लाख 37 हजार 550 रुपयांचे भाग भांडवल ,1 कोटी 07 लाख 96 हजारांचा निधी असून 2कोटी 76 लाख 78 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. तसेच बिडीसीसी बँक स...

संजय घोडावत यांना यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या 35 व्या पुणे फेस्टिवल मध्ये उद्योगपती संजय घोडावत यांना उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 22 सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंडळ रंगमंच येथे राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन,पुणे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे फेस्टिवल चे अध्यक्ष माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.      यावेळी खा. श्रीरंग बारणे खा.रजनी पाटील खा.हेमामालिनी उपस्थित होत्या.कला,क्रीडा,उद्योग, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आतापर्यंत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.   याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संजय घोडावत म्हणाले, की या मानाच्या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल आयोजकांचा मी खूप आभारी आहे.तसेच घोडावत उद्योग समूहाकडून सामाजिक, शैक्षणिक,उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रात व देशात अखंडित कार्य सुरू राहील. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.       संजय घोडावत यांनी घोडाव...

बबन यादव यांना पितृशोक

इमेज
  जयसिंगपूर : चिपरी गावचे माजी सरपंच बबन यादव यांचे वडील हरिभक्त श्री आनंदराव गणपती यादव यांचे रविवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास वयाच्या 92 व्या वर्षी जयसिंगपूर येथे वार्धक्याने दुखद निधन झाले, चिपरी चे माजी सरपंच बबन यादव यांचे ते वडील होत, त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली, भाऊ, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे, उदगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत रविवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कुंभार, माजी नगराध्यक्ष रवींद्र ताडे, माजी नगरसेवक सर्जेराव पवार,शितल गतारे,महेश कलकुटगी, अर्जुन देशमुख, खाडे बंधू, एडवोकेट संभाजीराजे नाईक, एडवोकेट एस.डी. जगदाळे,संभाजी कोळी,प्रकाश पवार,अमोल शिंदे, पत्रकार अमर पाटील, पप्पू दानोळे, बंडू निटवे, विजित पाचोरे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे स्वीय सहाय्यक अजय पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे संचालक अरविंद मजलेकर चिपरीचे माजी सरपंच रमेश रजपूत, शिवाजीराव बेडगे, अभिजीत भोसले, गटविकास अधिकारी ...

धनगर आरक्षणप्रश्नी सोमवारपासून आमरण उपोषण ; उदगांव येथे धनगर समाज्याचा एल्गार

इमेज
उदगांव / शिवार न्यूज नेटवर्क : धनगर समाजास एस.टी.आरक्षण अंमलबजावणी होण्यासाठी चौंडी (जि.अहमदनगर) येथे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवार (दि.25) रोजी उदगांव (ता.शिरोळ) येथील माळ भागावरील श्री उदयसिध्द बिरोबा मंदिरात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शिरोळ तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकांराना दिली. उदगांव येथे शिरोळ तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पदाधिकारी म्हणाले, संदिप गावडे, दिपक ठोबरे, अमोल मरळे हे आमरण उपोषणास बसणार आहेत. याला पाठिंबा देण्यासाठी शिरोळ तालुकयातील गावा-गावातून समाज एकत्रित येवून यात सहभागी होणार आहेत. जो पर्यत चौंडी येथील उपोषण मागे घेतले जात नाही तो पर्यत हे उपोषण सुरु राहणार आहेत. त्याचबरोबर गावा-गावात आंदोलनाला बळ देण्यासाठी वेगवेगळया पध्दतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने धनगर आरक्षणांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी आहे. तरी तालुक्यातील समाज बांधवानी सहभागी होण्याचे अहवान करण्यात आले आहे. यावेळी अमर पुजारी, बाळासाहेब बंडगर, संजय माने, रामभाऊ ब...

कल्याण मंडप सदलगा येथे "पालिका कर्मचारी दिन " संपन्न

इमेज
अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :  कर्नाटक राज्य नगरपालिका कर्मचारी सेवा संघ बेंगलोर शाखा सदलगा आणि सदलगा नगरपालिका सदलगा कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने "पालिका कर्मचारी दिन " आज कल्याण मंडप सदलगा येथील मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील सदलगा नगरपालिका कर्मचारी संघाची नगरपालिका कर्मचारी दिन आज कल्याण मंडप मंगल कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष श्री संजीव गुडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रारंभी कर्मचारी दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन नगरपालिका महिला कर्मचारी वर्गांच्या हस्ते छोट्या वृक्षाला पाणी अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व महिला सबलीकरणाचे महत्त्व समाजाला दाखवून दिले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष अभिजीत पाटील, नगरसेवक रवी गोसावी, बसवराज हनबर, आनंद पाटील, भीमराव माळगे ,हेमंत शिंगे, माजी नगरसेवक राजू अमृतसंम्मनावर, कैलास माळगे, सुनील नंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष नवले, अभिनंदन पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या नगरपालिका कर्मचारी दिनानिमित्त कर्मचारी वर्गामार्फत न...

नांदणीच्या पाटील प्रतिष्ठानचा राजापूरच्या खेळाडूला मदतीचा हात

इमेज
  नांदणी / शिवार न्यूज नेटवर्क : राजापूर ता. शिरोळ गावचा उदयोन्मुख युवा क्रिकेट खेळाडू मलिक खुतबुददीन मुजावर यास नांदणी येथील स्व. आपगोंडा कलगोंडा पाटील प्रतिष्ठानतर्फे मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श पाटील प्रतिष्ठानने जपला आहे. राजापूर येथील युवा खेळाडू मलिक मुजावर याची पुणे येथील स्टेडियम क्रिकेट क्लब या ॲकॅडमीमध्ये सराव करण्यासाठी निवड झाली आहे. मलिक हा बॅटिंग व विकेट कीपिंग मध्ये उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्या खेळाची दखल घेऊन त्याची निवड झाली आहे. पण मलिकच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने त्याला पुणे येथे जाण्यासाठी क्रिकेट साहित्याची आवश्यकता होती. पण परिस्थितीमुळे त्याला साहित्य खरेदी करणे शक्य नव्हते. मलिकची हि अडचण नांदणी गावचे सुपुत्र आणि मुंबई हायकोर्टातील प्रथितयश वकील मनोज पाटील यांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या वडिलांच्या नावाने स्थापित केलेल्या स्वः आपगोंडा कलगोंडा पाटील प्रतिष्ठानतर्फे मलिकला लागणारे क्रिकेट खेळासाठी लागणारे सर्व साहित्य स्वखर्चाने खरेदी करून दिले व एका उदयोन्मुख खेळाडूला पुढे जाण्यासाठी पाठबळ देण्याचे आदर्श...

श्री महालक्ष्मी गणेशोत्सव तरुण मंडळाची आरती माजी आमदार राजु आवळे यांच्या हस्ते संपन्न

इमेज
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : श्री महालक्ष्मी गणेशोत्सव तरुण मंडळांची आरती माजी आमदार राजु आवळे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी त्यांचा सत्कार नंदु जाधव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले. यावेळी सामाजिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व शिरोळ तालुका अध्यक्ष संदिप बिरणगे यांचा सत्कार विनोद ननवरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते व श्री महालक्ष्मी गणेशोत्सव तरुण मंडळांचे दिनेश कांबळे यांचा सत्कार मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल कुन्नुरे व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ई पीक पाहणी योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा : तहसीलदार अनिलकुमार हेळकर

इमेज
शिरोळात शेतकऱ्यांना मोबाईलवर ई पीक पाहणी अँप संदर्भात मार्गदर्शन शिरोळ : शिवार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेती पिकाची अचूक नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर ई पिक पाहणी हा उपयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ शिरोळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी घेऊन महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी केले. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शिरोळ मधील प्रगतशील शेतकरी शिवाजी चव्हाण यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांना मोबाईलवरच्या ॲपद्वारे ई पीक पाहणी उपक्रमा संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर हे बोलत होते. युवा नेते पृथ्वीराज यादव यांनी स्वागत करून शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सुरू असलेला हा उपक्रम लाभदायक असून या माध्यमातून आपल्या मोबाईल वरून आपल्या शेतातील स्वतःहून ई पीक पाहणी करता येणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे सांगितले. शिरोळचे मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी शासनाने सुरू केलेल्या ई पीक पाहणी योजने संदर्भात माहिती देऊन या योजनेमुळे ...

बाल शिवाजी मंडळाचा सद् गुरू बाळूमामा सजीव देखावा पाहण्यासाठी उडाली झुंबड

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : येथील श्री बाल शिवाजी मंडळ राजवाडा या मंडळाने गणेशोत्सवानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून ऐतिहासिक धार्मिक यासह समाज प्रबोधनपर सजीव देखाव्याच्या सादरीकरणातून सामाजिक एकात्मता टिकवण्याचा प्रयत्न केला आहे यावर्षी मंडळाच्या वतीने सादर करण्यात येणारा सजीव देखावा श्री.सद्गुरू बाळूमामा हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी झुंबड उडाली आहे           बाल शिवाजी मंडळ राजवाडाच्या कलाकारांनी सद्गुरू बाळूमामा हा सजीव देखावा सादर करीत असताना संत सद्गुरू बाळुमामा यांचे जीवन चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या राज्याला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते संतांच्या आशीर्वाद मार्गदर्शन आणि विचारानेच प्राणी मात्राचे जीवन सुखमय झाले आहे याची प्रचिती या देखाव्यात दाखवण्यात आली आहे श्री.संत बाळूमामा यांचे लहनापासून थोरापर्यंत, गरीबापासून श्रींमतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरांतील स्त्री-पुरूष त्यांचे भक्त होते व आहेत.शर्ट, धोतर फेटा, कांबळा, कोल्हापूरी चप्पल हा . सद्गुरु बाळूमामाचा पेहराव भाजी भाकरीचा साधा आहार . ऊन, वारा, पाऊस किंवा थंड...

आय एस एस ओ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये संजय घोडावत केंब्रिज स्कूलचे घवघवीत यश

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :  इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत सन 2023 24 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्रोमेथस इंटरनॅशनल स्कूल, नोएडा, दिल्ली या ठिकाणी दिनांक 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या दरम्यान केले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशातील इंटरनॅशनल स्कूलमधील विदयार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.          14, 17 व 19 अशा वयोगटातील विविध खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा याठिकाणी पार पडल्या. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी रायफल शूटिंग, स्विमिंग, बुद्धिबळ या स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले. त्याचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे खेळ प्रकार रायफल शूटिंग- 1 रियान घारपुरे सिल्वर मेडल 14 वर्षे वयोगट2  समवेद सावित्री ब्रांझ मेडल 14 वर्षे वयोगटखे ळ प्रकार स्विमिंग - 1 विश्वजीत पाटील ब्रांझ मेडल 19 वर्षे वयोगट2  फ्री स्टाइल रिले 14 वर्षे वयोगट मुले ब्रांझ पदक सहभागी मुले - तनिष भाटी, अर्जुन गिरीगोसावी, देवांश जव्हेरी, पार्श्व ओसवाल...

उद्योगपती राजेंद्र प्रसाद जांगिड यांच्याकडून आनंदीबाई कर्वे शाळेस खुर्च्या भेट

इमेज
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क : शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती राजेंद्र प्रसाद जांगिड यांनी शहरातील आनंदीबाई कर्वे शाळा क्रमांक १० या शाळेस स्वखर्चाने फायबरच्या दहा खुर्च्या भेट म्हणून दिल्या.           याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विलास रामाणे यांच्या हस्ते राजेंद्र जांगिड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विलास रामाणे,अमोल तोडकर,सौ.शैलजा पाटील मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेची प्रगती विशद करून मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सदरची मदत मिळवून देण्यात अमोल तोडकर यांचे सहकार्य लाभले. उद्योगपती राजेंद्र प्रसाद जांगिड यांनी शाळेने राबविण्यात आलेल्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. तर शाळेच्या सर्व उपक्रमांत हिरीरीने भाग घेवून योगदान देणारे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीकांत यवलूसकर यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी फिरोज कनवाडे,संभाजी डाकरे,स्नेहा दिवटे,स्वाती मोरे,मंजिरी कमते, सायरा मुजावर,उज्वला सरदेसाई,स्वप्नगंधा शेळके,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.

महिला विधेयकाकडे कुटुंबाचा उत्कर्ष म्हणून पाहू नका : खासदार धैर्यशील माने यांनी मांडली भूमिका

इमेज
  कोल्हापूर/ शिवार न्यूज नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीजनमधून आकारास आलेले महिला विधेयक आपल्या कुटुंबासाठी आहे. या दृष्टीने राज्यकर्त्यांनी पाहू नये असे विचार खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत मांडले. जो घटक आजपर्यंत राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजुला राहिला आहे. त्यांना कुठेतरी योग्य संधी मिळाली पाहिजे. ही या मागील संकल्पना आहे. त्यांनाही या विधेयकाच्या निमित्ताने सर्वाच्च अशा कायदे मंडळात ठसा उमटवण्याची संधी मिळेल. असा विश्‍वासही खा.माने यांनी बोलून दाखवला. संसदेच्या विशेष अधिवेशनात खा.माने यांनी विधेयकाला पाठींबा देत जोरदार भूमिका मांडली. त्यांनी आई माजी खासदार निवेदिता माने यांचा संघर्षमय पट ही सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या कार्याचाही आढावा घेतला.  ते म्हणाले, मी तीन वर्षांचा असताना वडीलांचे निधन झाले. आजोबा खा.बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर तब्बल पाच वेळा निवेदिना माने यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. तीन वेळा पराभव झाल्या, दोन वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या. महिला आरक्षण नसतानाही संघर्ष करण लोकसभेपर्यंत त्यांन...

महालक्ष्मी तरूण मंडळाची आरती सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते संपन्न

इमेज
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क : नवे दानवाड येथील महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळाची आरतीचा मान कुरूंदवाड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी नवे दानवाडचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सी. डी. पाटील, पोलिस पाटील डॉ. स्वाती कुन्नुरे, दिनेश कांबळे, अनिल कुन्नुरे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेरवाड उपसरपंचपदी हयातचॉंद जमादार यांची निवड

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : हेरवाड (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हयातचॉंद जमादार यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा जाधव होत्या. हेरवाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन पाटील यांचा आघाडीने नेमून दिलेला कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेच्या निवडीसाठी सरपंच रेखा जाधव यांनी ग्रामपंचायत सभागृहात बुधवारी विशेष सभा बोलवली होती. हयातचॉंद जमादार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच जाधव यांनी केली. यावेळी दिलीप पाटील, दामोदर सुतार, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव माळी, प्रथमेश पाटील, माजी सभापती मिनाज जमादार, सुवर्णा अपराज, पायगोंडा आलासे, सुनिल माळी, बाबासाहेब नदाफ, अब्दुल जमादार, शंकर माने, रघुनाथ पुजारी, एम.आर.आलासे, माजी सरपंच चंद्रकला पाटील, शोभा पाटील, सुभाष देबाजे, बंडू बरगाले, सदानंद आलासे, राजेंद्र परूळेकर, प्यारेलाल मकानदार, अर्जुन जाधव, सरदार जमादार यांच्यासह ग्रामविकास अधिकारी कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, नागरिक उपस्थित होते. उपसरपंचपदी जमादार यंाची निवड होताच समर्थकांनी फ...

गणेशवाडी पोलिसांच्या हिटलिस्टवर ; १८ जणांना हद्दपारची नोटीस

इमेज
  कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :   गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील गणेशोत्सवात गेल्या दोन वर्षांपासून गालबोट लागले आहे. त्यामुळे मिरवणुकीत हुल्लडबाजी करुन पोलिसांच्याच अंगावर जाण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडवणार्‍या १८ जणांना कुरुंदवाड पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे गणेशवाडीचा गणेशोत्सव पोलिसांच्या हिटलिस्टवर आला आहे.   गणेशवाडी हे कर्नाटक सीमेवरील व शिरोळ तालुक्यातील शेवटचे गाव आहे. आर्थिकदृष्ट्या सधन गाव मानले जाते. मात्र कर्नाटक सीमा भागातून दारु, गुटखा, गौन खनिजांच्या तस्करीमुळे हे गाव नेहमी चर्चेत असते.   गावातील सार्वजनिक गणेशोत्सव पाचव्या दिवशीच विसर्जन करण्याची पुर्वीपासुन परंपरा नव्या पीढीने आजही कायम ठेवली आहे. गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर प्रत्येक मंडळ लाखो रुपये खर्च करून कमाणी उभारली जाते. या आकर्षक कमानी करण्यावर मंडळामंळामध्ये स्पर्धा असते. हेच येथील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण आणि वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरीकांची उपस्थिती असते. त्यामुळे येथील गणेशोत्सव पश्चिम  महाराष्...

हेरवाडमध्ये लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : ढोलताशांचा गजर, टाळ्यांचा नाद आणि मोरया... मोरयाच्या गजरात हेरवाडमध्ये आज सकाळपासूनच उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले. भाविकांना प्रतीक्षा असलेला लाडक्या गणरायाचे आज घरोघरी वाजत गाजत आगमन झात्यामुळे या चैतन्यपर्वामुळे भाविकांमध्ये उत्साहात निर्माण झाला होता. हेरवाड मधील भाविकांनी जोरदार उत्साहात धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान आठवडाभरापासूनच गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती. दरम्यान आज सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी गणेश मूर्तीची खरेदी करत गणेशाचे घरोघरी आगमन तसेच मंडळांचे आगमन मोठ्या उत्साहात झाले.

आनंदाचा शिधा सामान्यांना दिलासा देणारा उपक्रम : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : गौरी गणपती सणाच्या निमित्ताने गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकाला हा सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अल्प दरात आनंदाचा शिधा दिला जात आहे ही बाब अतिशय स्तुत्य असून राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे राज्यातील गोरगरीब व सर्वसामान्यांच्या घरात देखील सणाचे उत्साही वातावरण निर्माण होईल, त्यामुळे आनंदाचा शिधा ही राज्य शासनाची योजना सर्वसामान्य नागरिकांना मदत करणारी व दिलासा देणारी आहे, असे उदगार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले, शिरोळ तालुका रेशन दुकानदार धारक संघटनेच्या वतीने लाभार्थींना आनंदाचा शिधा या किटचे वाटप आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते, राज्यातील लाखो कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार असून शिरोळ तालुक्यात ५९,८५३ कुटुंबाना आनंदाचा शिधा या योजनेचा लाभ मिळणार आहे असे सांगताना मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आमदार यड्रावकर यांन...

४०० रूपये दुसरा हप्ता दिल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येवू नये : राजू शेट्टी

इमेज
अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास सहा महिने झाले तरीही गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचा आर.एस. एफ सुत्रानुसार हिशोब पुर्ण न करता फायनल बिल निश्चीत करण्यात आले आहे.  सरकार व कारखानदार दोघेही संगनमताने ऊस उत्पादक शेतक-यांचा बळी घेत असून राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रूपये दुसरा हप्ता दिल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाना न देण्याची मागणी साखर आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार यांचेकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी केली आहे.       साखरेसह व उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळू लागले आहेत यामुळे देशामध्ये साखर उद्योग तेजीत आहे. राज्य सरकार व साखर कारखानदार हे दोघेही संगनमताने मिलीभगत करून शेतक-यांना साखरेच्या व उपपदार्थाच्या हिशोबात फसवणूक करत आहेत. काटा मारीतून तयार झालेल्या जादा साखरेच्या तपासणीसाठी उत्पादन शुल्क विभागाने साखर कारखान्याच्या गोडाऊनची तपासणी करावी. केंद्र सरकारचा महसूल बुडत असल्याने दर तीन महिन्यांनी साखर कारखान्यांच्या ...

सभासदांच्या विश्वासावर दत्त नागरीची यशवी घौडदौड सुरू : चेअरमन माधवराव घाटगे

इमेज
४८ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न   दत्त नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी मार्गदर्शन करताना चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे. शेजारी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व संचालक मंडळ.  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : सभासदांची विश्वाहर्ता हीच दत्त नागरी पत संस्थेची ओळख असून संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून संस्थेला उर्जितावस्था आणणेसाठी प्रयत्नशील आहेत. येणाऱ्या काळात संस्थेला गतवैभव प्राप्त होईल व परत सोन्याचे दिवस येथिल असा विश्वास गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केला. श्री दत्त नागरी सह पत संस्थेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडली. त्याप्रंसगी श्री . घाटगे बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने- देशमुख यांनी केले. जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचे वाचन केल्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरेत सर्व विषय एकमतांने मंजूर केले. यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले, दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उच्चावत चालला आहे. सन २०२२- २...

पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट बेरोजगारांना रोजगार देणारी वसाहत : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

इमेज
  पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : सहकाररत्न शामराव पाटील यड्रावकर यांनी अतिशय दूरदृष्टीने पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना केली, ही औद्योगिक वसाहत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारी वसाहत म्हणून आज नावारूपाला आली आहे, या वसाहतीमध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार कामगार काम करतात, यातील निम्म्याहून जास्त कामगार हे यड्राव आणि परिसरातील आहेत, पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट ची संपूर्ण जागा मैल खड्ड्यासाठी वापरण्याचा घाट काही मंडळींनी घातला होता,यड्राव आणि परिसरातील लोकांना याचा त्रास होऊ नये याची काळजी घेत स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर आणि त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी या जागेवर औद्योगिक वसाहत उभी करण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट ची निर्मिती झाली असे उदगार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले, पार्वती को-ऑपरेटिव इंडस्ट्रियल इस्टेट या संस्थेच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते, या वसाहती मधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होत असून य...

आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

इमेज
  अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क : चिकोडी तालुक्यातील सहकार क्षेत्रात अवघ्या पाच वर्षात उल्लेखनीय कार्य करून समाजातील उपेक्षितांचे अंतरंग ओळखून त्यांना आर्थिक सहाय्य देऊन संस्थेचा व सामान्य जनतेचा विकास करणारी संस्था म्हणून नावलौकिकाला आलेली आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची वार्षिक सभा आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाहुबली कलाजे यांनी आपल्या प्रास्ताविक व मनोगतात संस्थेच्या विकास व प्रगतीच्या कार्याचा आढावा घेताना, संस्थेने आतापर्यंत प्रगती कशी केली? याचा आलेख संस्थेच्या सदस्या समोर मांडला आणि यावर्षी संस्थेला 15 लाख 50 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला असून, संस्थेकडे अकरा कोटीपेक्षा अधिक ठेवी असून, सभासद संख्या 740 असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी ऑडिट रिपोर्ट 'ए' क्लास मध्ये असून संस्था संपूर्ण शहरांमध्ये 18% लाभांश देणारी एकमेव असल्याचे त्यांनी सांगितले. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रारंभी दीप प्रज्वलन माननीय अध्यक्ष श्री अमोल पाटील श्री बाहुबली कलाजे व उपस्थित मान्यवर श्री रामु कलाजे, बाळग...

भारत देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचा मोठा वाटा : प्रांताधिकारी मौसमी चौगुले

इमेज
  शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :        प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेश विद्यार्थी स्वागतोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी येथील प्रांताधिकारी मौसमी चौगुले, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चेअरमन गणपतराव पाटील, शिरोळ तालुका तहसीलदार अनिलकुमार हेलेकर, मॅनेजिंग डायरेक्टर एम. व्ही. पाटील, ट्रस्टचे डायरेक्टर ए. एम. नानीवडेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रथम पवर्ष प्रवेश विद्यार्थ्यांना फुलांची रोपे देऊन स्वागत करण्यात आले.   यावेळी बोलताना मौसमी चौगुले म्हणाल्या, भारत देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचा मोठा वाटा आहे. अभियंता दिनी विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. शिक्षण घेण्यासाठी अपार कष्ट, जिद्द, चिकाटी ठेवा. भारताला महासत्ता होण्यासाठी आपले योगदान द्यावे लागेल. सर विश्वेश्वरय्या यांनी बांधलेले धरण आजही सुस्थितीत आहेत. असे अभियंते आपणही बनले पाहिजे असे सांगून त्यांनी केलेल्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. दत्त पॉलिटेक्निक कॉलेज मधील परीसर पाहून मी भारावून गेले असे गौरवोद्गारही त्यांनी काढ...

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावरून माझी माती माझा देश उपक्रमाची सुरुवात

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या "माझी माती, माझा देश" मातीला नमन, वीरांना वंदन या उपक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून करण्यात आला याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते माझी माती माझा देश या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रदेश महामंत्री अनुप मोरे, प्रदेश महामंत्री सुदर्शन पाटसकर, प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे, प्रिया पवार, अजिंक्य टेकावडे, श्रीराज ढेरे, विजयेंद्र माने, प्रदेश सचिव कोल्हापूर पूर्व प्रभारी सागर वनखंडे,सुशांत पाटील,अजित कुलथे, तेजस्वीनी कदम, पांडुरंग वहीले, रवि तिवारी, सौरभ कुंडलिक, रौनक शेट्टी अनिकेत हरपुडे प्रवीण फोंडे विद्यार्थी विभाग संयोजक रमाकांत कापसे, प्रशांत सपकाळे, स्वप्निल काळे, भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुत्ते पाटील जुन्नर विधानसभा प्रमुख आशाताई बुचके, मंडल अध्यक्ष संतोष खैरे, पुणे उत्तर जिल्हा अध्यक्ष संदीप सातव, सुशांत पाटील, अक्षय वरपे,सुहास जाधव ,...

पूरग्रस्तांचे पुनर्वसन कामी कोल्हापूर जिल्हाधिकार्‍याना सूचना देऊ : मंत्री अनिल पाटील

इमेज
  पांडुरंग गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे मदत पुनर्वसन मंत्री पाटील यांना निवेदन  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : गेल्या पाच वर्षात तीन वेळा आलेल्या महापुराच्या संकटामुळे पूरग्रस्त कुटुंबांचे अतोनात हाल होत आहे . पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी लक्षात येऊन शासनाने शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावे व त्यांना आवश्यक त्या नागरी सुविधा द्याव्यात अशी मागणी शिरोळ तालुका पूरग्रस्त सेवा संस्थेच्या वतीने मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . दरम्यान , मुंबई मंत्रालय येथे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन पूरग्रस्त सेवा संस्थेचे प्रमुख पांडुरंग गायकवाड ,सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कांबळे , मेजर युवराज पाटील, चंद्रकांत कांबळे ,गजानन कांबळे , भगवान सनगर , मच्छिद्र चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा मांडल्या. यावेळी मंत्री पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयास पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसना संदर्भात योग्य त्या...

बालाजी माध्यमिक विद्यालयाचे बास्केटबॉल स्पर्धेत तिहेरी यश

इमेज
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क : इचलकरंजी महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल स्पर्धा दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदरच्या स्पर्धा 14, 17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये बालाजी माध्यमिक विद्यालयातील 14,17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या सर्वच संघानी प्रथम क्रमांक पटकावून प्रशालेचे नांव उज्वल केले सदर सर्व संघाची विभागीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली. सदर स्पर्धेचे उद्घाटन इचलकरंजी महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अभियंता संजय बागडेसाहेब व हातकणंगले तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेखर शहा सर तसेच महानगरपालिका क्रीडाधिकारी संजय शेटे यांच्या शुभहस्ते होऊन स्पर्धा सुरु झाल्या. सदर प्रसंगी सहा क्रीडा अधिकारी संजय कांबळे व मुख्याध्यापक शंकर पोवार सर, बास्केटबॉल असोशिएशनचे सचिव किरण कोष्टी उपस्थित होते. या सर्वं यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडाविभागप्रमुख राजेश चौगुले सर, उत्तम मेंगणे सर, रवीं चौगुले सर ...

श्री दत्त कारखान्याच्या संशोधन पेपरला द्वितीय क्रमांकाचे 'सर्वोत्कृष्ट पेपर पारितोषिक' जाहीर

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :       डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) च्या वतीने आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट पेपर पारितोषिक मध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सादर केलेल्या संशोधन पेपरला कृषी विभागामधील 'डी. एस. टी. ए. पारितोषिक- के. पी. देशमुख स्मृती पुरस्कार' हे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशनच्या 67 व्या वार्षिक अधिवेशनात याचे वितरण होणार आहे.       "श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या ऊस उत्पादनावर आणि उत्पादकतेवर प्रभाव टाकून क्षारयुक्त मातीच्या पुनरुत्पादनावर सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा केस स्टडी" या शिर्षकाखालील संशोधन पेपरला तज्ज्ञ परीक्षकांनी 'सर्वोत्कृष्ट पेपर पारितोषिक' साठी निवडले आहे.        दि. 24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जे. डब्ल्यू. मॅरियट, पुणे येथे बक्षीस वितरण होणार आहे. अशी माहिती कार्यकारी सचिव गौरी पवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे.      श्...

जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्थेची ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

इमेज
  इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क : जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था इचलकरंजी या संस्थेची ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी नारायणी हॅाल,इचलकरंजी येथे उत्साहात संपन्न झाली.         संस्थापक अशोक कोळी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.चेअरमन जया कोळी यांनी सर्वांचे स्वागत करुन संस्थेचा ताळेबंद सादर केला. अवघ्या ६ वर्षात संस्थेने नेत्रदिपक प्रगती केलेली आहे. सभासद संख्या -१६०० इतकी असून भागभांडवल १,२८,४९,१०० इतके आहे. ठेवी१६,६०,६९,७०९ असून १७,४०,३३,०४३ इतकी कर्जे वाटप केलेली आहेत. संस्थेला३०,२०,९७९ रुपये नफा झालेला आहे.ऑडीट वर्ग अ मिळालेला आहे.१० % लाभांश वाटप करण्यात आलेला आहे.व्ही.एच. पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.सर्व विषयांनी सभासदांनी एकमतांनी मंजुरी दिली. सभासदांनी संस्थेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा करणेस मंजूरी दिली त्यामुळे यापुढील काळात जिजाऊ पतसंस्था जिल्ह्याच्या नकाशावर येणार.           याप्रसंगी पुरस्कार प्राप्त शाळा, शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षक,विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी या...

तुषार कांबळे यांच्या सामाजिक कार्याचा युवकांनी प्रेरणा घ्यावी : भीमपुत्र संतोष दोड्डमनी

इमेज
  अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :      आजच्या युगात राजकारणा पेक्षा सामाजिक कार्याला मोठे महत्त्व आहे, त्यामुळे आजचे अनेक युवक सामाजिक कार्यात अग्रेसर असताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांचे कार्य सामाजिक कार्य प्रेरणा देत आहे, समाजासाठी आपण काहीतरी देण लागतो या उदात्त हेतूने आज तुषार कांबळे यांनी वाढदिवशी होणारा डॉल्बी केकला व अन्य कार्यक्रमाला फाटा देऊन समाजातील गरजू लोकांच्यासाठी आपण काहीतरी मदत करावे या उद्देशाने आज त्यांनी वाढदिनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत . हे आजच्या युवकांना प्रेरणादायी ठरणार आहे. असे मत चिकोडीचे सामाजिक कार्यकर्ते भीमपुत्र संतोष जोडमणी यांनी व्यक्त केले.  ते बोरगाव येथील बेडकिहाळ रोड वरील राज किचन हॉलमध्ये तुषार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बेळगाव जिल्हा मानव बंधू वेदीकेचे जिल्हाध्यक्ष व बेळगाव जिल्हा ॲट्रॉसिटी ॲक्ट संचालक जीवन मांजरेकर हे होते.    सुरुवातीस वृक्षास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्य...

श्री दत्त भांडारच्या सभासदांना १२ टक्के लाभांश : गणपतराव पाटील

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :      श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था अर्थात दत्त भांडार ग्राहकांची विश्वासार्हता आणि ग्राहकांना सुविधा देण्यामध्ये अग्रभागी राहिके असून या संस्थेची प्रगती चांगल्या पद्धतीने होत आहे. ग्राहक आणि सभासद यांचा या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असून यावर्षी 12 टक्के लाभांश देत आहोत. आगामी काळातही अत्याधुनिक सोयी सुविधा ग्राहकांना देण्यास आपण सातत्याने प्रयत्न करीत राहू, असे प्रतिपादन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.      श्री दत्त कारखाना सभागृहात आयोजित श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्थेच्या 41 व्या वार्षिक साधारण सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी सर्व सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.       संस्थेचे चेअरमन दामोदर सुतार यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या वर्षभरामधील कार्याचा आढावा घेतला तसेच बाजारपेठेमध्ये तीव्रतेने वाढत असलेले बाजारभाव, वाढती स्पर्धा आणि सहकारी संस्था असल्याने शासन निर्बंधांचे पालन करीत संस्थेने आपली प्रागतिक वाटचाल सुरू ठेवल्याचे सांग...

शिरोळात श्री गुरुदत्त इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनियर्स व माने परिवाराच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :  आपण विविध क्षेत्रात काम करीत असताना केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार केला जातो या सत्कारामुळे आपण करीत असलेल्या कार्याची जबाबदारी पुन्हा वाढत जाते याचे भान ठेवून शिरोळच्या विकासासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे कार्यरत रहावे असे प्रतिपादन लायन्स क्लबचे झोन चेअरमन व युवा उद्योजक सचिन माळी यांनी केले. शिरोळ येथील श्री गुरुदत्त इलेक्ट्रिकल्स अँड इंजीनियर्स या उद्योग समूहाचे प्रमुख व इलेक्ट्रिकल गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर युवा उद्योजक अभिजीत दिलीपराव माने आणि श्री रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव रामचंद्र माने व माने परिवाराच्या वतीने विविध निवड क्षेत्रात झालेल्या मान्यवर तसेच स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेले विद्यार्थी आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी युवा उद्योजक सचिन माळी हे बोलत होते ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते स्वागत दिलीपराव माने यांनी केले प्रास्ताविक डॉ. दगडू माने यांनी केले. गुरुदत्त शुग...