पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गणेश मंडळांनी ईलेक्ट्रिक डेकोरेशन पावसात भिजून कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी : सपोनि बालाजी भांगे

इमेज
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पावसामुळे लायटिंग ,तसेच ईलेक्ट्रिक डेकोरेशन पावसात भिजून कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाच्या घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, यावर्षी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच मंडळांनी मोठी जय्यत तयारी केली आहे, मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लायटिंग ,तसेच ईलेक्ट्रिक डेकोरेशन पावसात भिजून कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाच्या घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, आपल्या गणेश मुर्ती व ईलेक्ट्रिक साहीत्य भिजणार नाही व दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नांदणी : वेश्या व्यवसायावर शिरोळ पोलिसांची कारवाई

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : नांदणी तालुका शिरोळ हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे वेश्या व्यवसायचालवणाऱ्या दोन महिलांच्यावर शिरोळ पोलिसांनी कारवाई करून दोन पिडित महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमध्ये तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.   याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, नांदणी तालुका शिरोळ हद्दीत असणाऱ्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे मुस्कान उर्फ बिस्मिल्ला मुबारक शेख वय 50 व इंदुमती महावीर आरबाळे वय 50 यांनी एकमेकांच्या संगनमताने रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे चिपरी फाट्या नजिक वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करून या दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये रोख रक्कमेसह तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे करित आहेत.

हेरवाड मध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क ढोलताशांचा गजर, टाळ्यांचा नाद आणि मोरया... मोरयाच्या गजरात हेरवाडमध्ये आज सकाळपासूनच उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले. भाविकांना प्रतीक्षा असलेला लाडक्या गणरायाचे आज घरोघरी वाजत गाजत आगमन झात्यामुळे या चैतन्यपर्वामुळे भाविकांमध्ये उत्साहात निर्माण झाला होता. मागील दोन वर्ष कोरोना काळ असल्याने गणपती बाप्पाचं आगमन झालं, मात्र फारसा उत्साह नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे मळभ दूर झाल्याने भाविकांनी जोरदार उत्साहात धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान आठवडाभरापासूनच गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती. दरम्यान आज सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी गणेश मूर्तीची खरेदी करत गणेशाचे घरोघरी आगमन तसेच मंडळांचे आगमन मोठ्या उत्साहात झाले, दरम्यान आज रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे गणेशभक्तांची निराशा झाली.

लोककलाकार उषा हंकारे यांचे निधन

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात कलापथकाच्या रंगमंचावर लावणी साम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या उदगाव (ता शिरोळ) येथील उषा कुबेर हंकारे (वय वर्षे 57) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या पश्चात पती , दोन मुले असा परिवार असून हंकारे परिवाराने कलापथक, नाट्य ,चित्रपट क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे ,कोल्हापूर येथील हंकारे ऑर्केस्ट्रा कलापथकाचे निर्माते व प्रसिद्ध लोककलाकार कुबेर हंकारे यांच्या त्या पत्नी होत.       उषा हंकारे यांनी आयुष्याच्या प्रवासात प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत लोककलाकार म्हणून कला क्षेत्रात मोठे योगदान दिले, लोककलाकार, ऑर्केस्ट्रा , लावणी शो ते सिने अभिनेत्री असा प्रदीर्घ प्रवास त्यांनी केला, तालुक्यातील उदगाव गावच्या त्या सुनबाई होत्या, माळावरच फुल, ठिणगी, माहेरची पाहुणी , लेक चालली सासरला या चित्रपटात त्यांची विशेष भूमिका असून कलाकारांच्या जीवनावर आधारित 'कुबेर' मराठी चित्रपटाच्या निर्मात्या होत्या.

हेरवाड मध्ये मंगळवारी होणार करबल दंगल

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे हिंदू मुस्लिम करबल कमिटीच्या वतीने भव्य करबल दंगल आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार दिनांक ३० रोजी रात्री नऊ वाजता ग्रामपंचायत पटांगणावर होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.  या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सुकुमार पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. या स्पर्धेसाठी अनुक्रमे ११ हजार १, ५ हजार १, ४ हजार १, ३ हजार १, २ हजार १, १ हजार १ अशी बक्षीसे तसेच शिल्ड देण्यात येणार आहेत. उद्घाटन प्रसंगी सरपंच सुरगोंडा पाटील, दिलीप पाटील, वसंतराव देसाई, दामोदर सुतार, हुसेन जमादार, बाळासो माळी, सुवर्णा अपराज, रेखा जाधव, बाबुराव माळी, प्रशांत चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची फेरनिवड

इमेज
  शिवार न्यूज नेटवर्क : देशभरातील सहकारी सूतगिरण्या व वस्त्रोद्योग क्षेत्रातील सहकारी तत्त्वावरील अनेक संस्थांचे नेतृत्व करणाऱ्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कॉपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स मुंबई या संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची बिनविरोध निवड संपन्न झाली, या संस्थेवर अनेक वर्षे सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांचे वर्चस्व होते, संस्थेच्या उपाध्यक्षपदी कर्नाटक स्टेट को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स फेडरेशनचे चेअरमन एस. एस. दोडमणी यांची निवड झाली, अध्यक्षपदी निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट ए.जी  पंडीत होते, निवडीनंतर बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले सहकारी सूतगिरण्यां समोरील अडचणी पाहता यातून मार्ग काढण्यासाठी आपण राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून यापुढेही सर्वांना सोबत घेऊन काम करत राहू व अडचणीत असलेल्या सहकारी तत्त्वावरील सूतगिरण्यांना पुन्हा ऊर्जित अवस्था कशी येईल यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले, अध्यक्ष...

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची फेरनिवड

इमेज
  शिवार न्यूज नेटवर्क : देशभरातील सहकारी सूतगिरण्या व वस्त्रोद्योग क्षेत्रातील सहकारी तत्त्वावरील अनेक संस्थांचे नेतृत्व करणाऱ्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कॉपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स मुंबई या संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची बिनविरोध निवड संपन्न झाली, या संस्थेवर अनेक वर्षे सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांचे वर्चस्व होते, संस्थेच्या उपाध्यक्षपदी कर्नाटक स्टेट को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स फेडरेशनचे चेअरमन एस. एस. दोडमणी यांची निवड झाली, अध्यक्षपदी निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट ए.जी  पंडीत होते, निवडीनंतर बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले सहकारी सूतगिरण्यां समोरील अडचणी पाहता यातून मार्ग काढण्यासाठी आपण राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून यापुढेही सर्वांना सोबत घेऊन काम करत राहू व अडचणीत असलेल्या सहकारी तत्त्वावरील सूतगिरण्यांना पुन्हा ऊर्जित अवस्था कशी येईल यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले, अध्यक्ष...

अपूर्वा साठी एक हात मदतीचा : आजी-माजी सैनिकांनी केली २० हजाराची मदत

इमेज
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील आजी-माजी सैनिकाकडून २० हजाराची रोख रक्कम अपूर्वा शिरढोणे या बालिकेच्या उपचारासाठी दत्तवाड येथील समितीकडे सुपूर्त करण्यात आली. दत्तवाड येथील अपूर्वा शिरढोणे या बालिकेला भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. तिच्यावर सांगली येथे सध्या उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती बेताची आणि आईना पोरक झालेल्या मुलीला आर्थिक मदतीचा हातभार मिळणं फार गरजेचे आहे. असे आवाहान समाजात करण्यात आलं होतं. या आव्हानाला साथ देत सैनिक टाकळी तालुक शिरोळ येथील समाज उपयोगी कार्य करणारे सध्या सैन्यात असणारे सैनिक व सैन्यातून निवृत्त झालेली सैनिक अशा आजी-माजी सैनिकांनी काढलेला ग्रुप जो नेहमी रंजल्या गांजल्याकरिता नेहमी अग्रभागी काम करतो. त्या 'आर्मी वॉरियर्स' या ग्रुपमधील सदस्यांच्या कडून या बालिकेसाठी एक हात मदतीचा म्हणून २० हजाराची मदत दत्तवाड येथील समितीकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी सैनिक टाकळी येथील माजी सैनिक बबन पाटील, सुहास जाधव, अनिल बाबर, संजय पाटील, केदार पाटील, प्रवीण पाटील, ग्रा.पं. सदस्य संजय पाटील, माजी उपसरपंच राजगोंडा प...

आधार अपडेट शासनाचे काम : खंडेराव जगदाळे

इमेज
सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क : इयत्ता पहिली ते बारावी अखेर सर्व विद्यार्थ्यांचे स्टुडन्ट पोर्टल वरती आधार अपडेटेशन करण्याचे काम शाळास्तरावरती सुरू झालेले आहे. या साईटमध्ये असणाऱ्या तांत्रिक बाबींचा विचार करता शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अपडेट करताना जीव मेटाकुटीस येत आहे. विद्यार्थ्यांचे आधार अपडेट होऊन देखील पुन्हा त्यांचे नाव मिस मॅच मध्ये दिसत असल्याने अनेकांनी या साइट वरती शंका उपस्थित केलेली आहे . याबाबतीत शासन स्तरावरती विचार करण्यात यावा अन्यथा शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी व्यक्त केले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये सर्व शाळांनी 100% विद्यार्थ्यांचे अपडेट करून त्याबाबतचा अहवाल खात्याकडे सादर केला असताना देखील अनेक शाळांचा रिपोर्ट पाहता सांख्यिकीक माहिती जुळत नसल्याचे दिसून येत आहे . कोरोना महामारी मुळे मागील दोन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे .या विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणत असताना शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता आम्हाला विद्यार्थ्यांना शिक...

अपूर्वाच्या मदतीसाठी धावले अ‍ॅड. सुशांत पाटील

इमेज
दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क : दत्तवाड येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अपूर्वा अण्णाप्पा शिरढोणे या मुलीच्या उपचारासाठी अ‍ॅड सुशांत संजय पाटील यांनी आर्थिक मदत करून पुढे उपचारासाठी मयूर उद्योग समूह तर्फे सहकार्य करू असे आश्वासन दिले.  सदर मुलीच्या तब्बेतीची विचारपूस करून जखमी अपूर्वा आणि वडील श्री अनिल शिरढोणे यांचेकडून माहिती घेतली. यावेळी उपस्तिथ नातेवाईक यांना धीर दिला. तसेच माननीय तहसीलदार शिरोळ व दतवाड सरपंच यांना भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सूचनाही केल्या.

आमदार यड्रावकरांनी केली अपूर्वाच्या तब्येतीची विचारपूस

इमेज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क यांनी भेट देऊन सदर मुलीच्या तब्बेतीची विचारपूस केली भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याची माहिती जखमी अपूर्वा आणि तिचे वडील अनिल शिरढोणे यांचेकडून घेतली आणि वडील आणि यावेळी उपस्तिथ नातेवाईक यांना धीर दिला त्यावेळी हजर असलेले सांगली सिविल हॉस्पिटल चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड व अपूर्वा वर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांचेकडून अपूर्वाच्या तब्बेती संदर्भात माहिती घेऊन योग्य ती काळजी घेण्याचे आदेश दिले, अपूर्वा साठी रुग्णालयात स्वतंत्र खोली उपलब्ध करून द्यावी असेही आदेश त्यांनी यावेळी दिले अपूर्वाच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत आपण करू असेही त्यांनी यावेळी अपूर्वाच्या नातेवाईकांना सांगितले.

बग्गा नंबर ६ चे कारभारी नागाप्पा पुजारी यांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क श्री संत बाळूमामा देवस्थानचे बगा नंबर 6 चे मुख्य कारभारी सर्वेसर्वा नागाप्पा पुजारी यांचा सत्कार हेरवाड धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सदस्य धोंडीबा कोरूचे, आप्पा पुजारी, राजू पुजारी, सुरेश देबाजे, शंकर कोरुचे, आमुकसिद्ध अकिवाटे, म्हालिंग अकिवाटे, सुनील देबाजे, मुत्तप्पा कोरचे, बिरसिद्ध बाणे, सागर इटाज, हैबत्ती वाघे, भगवान शिंगाडे, सुरेश अकिवाटे, रामा अकिवाटे व समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते.

अपूर्वाच्या मदतीसाठी सरसावले चंदूकाका सराफ

इमेज
दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क : दत्तवाड येथील हिंस्र कुत्र्यांच्या हल्ल्यात जीवदान मिळालेल्या  अपूर्वा शिरढोणे या मुलीच्या उपचार व इतर खर्चासाठी  अपूर्वाची  वडील आणी आजी यांच्याकडे २७३०० रु रोख रक्कम आदिनाथ होसकल्ले. सुरेश रेडेकर शितल खोत यांच्यामार्फत दवाखान्यात सुपूर्त करण्यात आली.  मदतीच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून  सैनिक टाकळी येथील  उद्योगपती  अविनाश मगदूम  यांच्या  प्रयत्नातून जयसिंगपूर येथील त्यांचे सासरे  बिल्डर्स आदिनाथ होसकल्ले व त्यांचे परममित्र महाराष्ट्रातील नामवंत ज्वेलर्स चंदुकाका सराफ यांनी अपूर्वा बद्दल सखोल माहिती घेऊन मदतीची गरज असणाऱ्या  अपूर्वाच्या उपचारांसाठी भरीव मदत केली. त्याचबरोबर अतुल भाई शहा, पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योगपती आशिषजी शहा आनंद शहा तसेच जयसिंगपूर येथील बांधकाम व्यावसायिक रविंद्र कागवाडे तसेच अनेक मोठ्या व्यक्तींच्याकडून मदत जमा होत आहे . घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची  आणि आईविना पोरक्या असणाऱ्या मुलीला उपचारासाठी मदतीचा ओघ वाढायला हवा. मुलीचे भावी आयुष्य व शिक्षणासाठी देखील ...

शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी ५१ कोटीचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क शिरोळ तालुक्यातील गावा गावांना जोडणारे रस्ते, ग्रामीण जिल्हा व राज्य मार्ग दुरुस्ती करणे त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूने गटर्स बांधणे यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील गावागावांना जोडणारे रस्ते खराब झाले होते त्यामुळे नागरिकांना दळणवळण करणे अथवा शेती व अन्य सामग्रीची वाहतूक करणे अडचणीचे व त्रासाचे ठरत होते त्यामुळे या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन मिळावा व त्यासाठी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनांमधील पुरवणी अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागणी यादीत निधीची तरतूद व्हावी अशी आपण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागणी यादीत ५१ कोटी रुपयांचा निधीची तरतूद शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी झाली आहे, लवकरच या कामांच्या निविद्या प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असेही आमदार राजेंद्र पाटील यड्र...

दत्तवाड येथील नरभक्षक हिंस्त्र कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा - संतोष आठवले

इमेज
जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त पठाण यांना दिले निवेदन कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  दत्तवाड तालुका शिरोळ येथे नरभक्षक हिंस्त्र कुत्र्याने तेरा वर्षी लहान मुलीवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा संघर्षनायक राष्ट्रीय बहुजन मिशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले हुसेन मुजावर , समिर विजापूरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पठाण यांना भेटून दत्तवाड येथील वारंवार नरभक्षक हिंस्त्र कुत्रे मानवी जीवितास धोका निर्माण करत आहेत मागील वर्षी शेतमजूर महिलेस व नवे दानवाड येथील शेतकरी आंबूपे अशा दोघांना नरभक्षक हिंस्र कुत्र्यानी हल्ला करून जीवे ठार मारले होते तर दत्तवाडयेथील शेतकरी बंदेनवाज अपराध यास गंभीर जखमी केले होते या संदर्भाची तक्रार आपले सरकार पोर्टलवर संघर्षनायक राष्ट्रीय बहूजन मिशनच्या वतीने देण्यात आले होती त्यास प्रशासनाकडून इथून पुढच्या काळामध्ये नरभक्षक हिंस्त्र कुत्र्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येईल अशी लेखी पत्र देण्यात आले होते मात्र दिनांक...

छायाचित्रकारांनी कधीही स्वतःला कमी समजू नये : डॉ. शंकर कुंभार

इमेज
  जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क      संपूर्ण जगभर आज जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात संपन्न केला जातो शिरोळ तालुक्यातील शिरोळ तालुका फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स सहकारी संस्था मर्यादित जयसिंगपूर यांच्या वतीने मराठा मंडळ हॉल जयसिंगपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर अशा वेगवेगळ्या शहरातून अनेक फोटोग्राफर यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री डॉ. शंकर कुंभार (अण्णा) देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, प्रमुख अतिथी चंद्रकांत जाधव (उपाध्यक्ष मराठा महामंडळ) पाहुण्यांनी बोलताना सर्व फोटोग्राफर यांना जागतिक छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या कुंभार अण्णा बोलताना म्हणाले या जगामध्ये कोणताही कार्यक्रम फोटोग्राफर यांच्या विना अपुरा आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमांमध्ये फोटोग्राफरचे स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते, कोणताही कार्यक्रम फोटोग्राफर शिवाय केला जात नाही, त्यामुळे छायाचित्रकारांनी कधीही स्वत...

गणपती कोळी यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवून सन्मान

इमेज
नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क  शिरोळच्या कलाविश्व रंगभूमी व सोशल फाउंडेशन यांच्यावतीने दै.लोकमतचे कुरुंदवाड प्रतिनिधी गणपती कोळी यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य अशोकराव माने, चिमासाहेब जगदाळे कॉलेजचे मुख्य विश्वस्त धनाजीराव जगदाळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिरोळ येथील कलाविश्व रंगभूमी व सोशल फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने येथील चिमासाहेब जगदाळे कॉलेज सभागृहामध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध गुणीजनांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट पत्रकार म्हणून युवराज पाटील (सकाळ), विनोद पुजारी (पुढारी), महेश पवार (महान कार्य) यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर आदर्श समाजरत्न पुरस्काराने सुरेश सासणे, विश्वास बालिघाटे, वीरस्वामी तूपदळे, कर्तवनिष्ठ पुरस्काराने रोहित डावाळे, अमर फडतारे, कृषीभूषण पुरस्काराने राजकुमार नकाते, आदर्श शिक्षकरत्न दत्तात्रय आंधळे यांना गौरवण्यात आले  यावेळी नवे पर्व या विश...

मैत्री फौंडेशनच्या वतीने खडके कुटूंबाला मदतीचा हात

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : इचलकरंजी येथील मैत्री फौंडेशनच्या वतीने शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटूंबियांना दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. इचलकरंजी येथील मैत्री फौंडेशन कायमच सामाजिक कामात अग्रेसर असते, हेरवाड येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याचे पीक कर्ज फेडण्यातही या फौंडेशनचे मोलाचे योगदान आहे. एवढ्यावरच न थांबता या फौंडेशनच्या वतीने या कुटूंबाला दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देवून सामाजिक बांधिलकी जोपासली यासाठी या फौंडेशनच्या अध्यक्षा वहिदा नेजकर, चंद्रप्रकाशजी छाजेर यांचे सहकार्य लाभले, यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव माळी उपस्थित होते. 

कोरवी समाजाबांधवांच्या पाठीशी मी ठामपणे ः तानाजी आलासे

इमेज
 कोरवी समाजाबांधवांच्या पाठीशी मी ठामपणे ः तानाजी आलासे कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : कोरवी समाज ओंकार गणेशोत्सव मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी येथील योगेश यशवंत कोरवी याची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुरुंदवाड शहराध्यक्ष तानाजी आलासे, कोरवी समाजाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजयकुमार माने यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना तानाजी आलासे म्हणाले, कोरवी समाजाचा विकास होण्यासाठी समाजातीलच तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. समाजातील तरुणांनी आपला प्रश्न सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून लढा देणे गरजेचे आहे, यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर राहू असे सांगितले. यावेळी बोलताना विजयकुमार माने म्हणाले, समाजातील तरुणांनी आता एकजुट होणे गरजेचे आहे, समाजाच्या हितासाठी समाजबांधवांनी आता शांत न बसता आपल्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येवून आपली एकजुट दाखविणे गरजेचे असल्याने कोरवी समाजाच्या प्रत्येक अडीअडचणी सोडविण्यासाठी मी कटीबध्द असल्याचे सांगितले. यावेळी जेष्ठ समाजसेवक बिरू गावडे, आण्णाप्पा कोरवी, सूरज कोरवी, रणजीत कोरवी, सुशांत कोरवी, विशाल...

राजकीय गुफ्तगू ; खासदार - आमदारांची जयसिंगपूरात भेट

इमेज
  शिवार न्यूज नेटवर्क खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी दुपारी माजी मंत्री आणि शिरोळचे  आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची त्यांच्या जयसिंगपूर येथील जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली या दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडी वर जवळपास 45 मिनिटे बंद खोलीत चर्चा झाली यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार राजेंद्र पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

सन्मती शाळेत गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटप

इमेज
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी ही संस्था सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते याचाच एक भाग म्हणून जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ इचलकरंजी संचलित सन्मती बौधिक अक्षम मुलांची शाळा व कार्यशाळा येथील विद्यार्थ्यांना लायन्स क्लबने आर के कॉलनी कीटी ग्रुप ,शांतीदेवी जसराजजी बालर , शांताजी अशोक सालेचा ,जमनालालजी काबरा, कमलादेवी गौतमचंद बालर याच्या सहकार्याने ६ विद्यार्थ्याना दतक घेऊन सामाजिक बांधिलकीचा नवीन पायंडा लायन्स क्लब ने पाडला ,रक्षाबंधन निमित्ताने सौ. कांता बालर, सौ ललिता जोशी, सौ महादेवी किन्तुरे, सौ शुभांगी पाटील या लायन भगिनीनी मुलांना औक्षण करून मुलांना राख्या बांधून शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी श्री सत्यनारायण भराडीया व कैलास जोशी यांच्या सहकार्याने महेंद्र बालर यांचे हस्ते गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी इचलकरंजीचे अध्यक्ष लायन महेंद्रजी बालर शाळेसाठी कायम सहकार्य करण्याचे आस्वासन दिले. उपस्थितांचे स्वागत व परिचय श्री सुकुमार पोते यांनी केले. तर प्रास्तविक श्री सुभाष काडाप्पा यांनी केले. सुञसंचलन व आभार श्री संजय कुभार यांनी ...

कुमार, कन्या,उर्दू घोसरवाड शाळेत अमृतमहोत्सवी ध्वजारोहण उत्साहात साजरा

इमेज
घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क            अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त अतुल लिमिटेड पुणे यांचे मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी अतुल लिमिटेड पुणे यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.            याप्रसंगी कंपनीचे पदाधिकारी श्री.राहुल वाळवेकर,धनंजय गायकवाड,संतोष चौगुले तसेच दत्तवाड केंद्राचे केंद्रीय प्रमुख रमेश कोळी सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रामचंद्र नंदीकुरळे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. शितल सतिश चव्हाण,सदस्या सौ. वैशाली कुटवटे मॅडम,श्री.राजू ढोणे, मुख्याध्यापक -संजय निकम सर,अध्यापक -शामराव कांबळे,गुंडा परिट,दत्ता कचरे,अनिल मंगावे,दशरथ खोत,नंदकुमार पोवार, रामचंद्र खोत उपस्थित होते.

हेरवाड मध्ये बाळूमामांच्या रथाचे उत्साहात स्वागत

इमेज
  हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे महान संत श्री बाळूमामा यांचे रथ व मेंढरांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरुन रथाची मिरवणूक काढण्यात आली. या रथाचे प्रत्येक चौकात रांगोळी काढून मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी स्वागत केले. महाराष्ट्रतील महान योगी संत म्हणून बाळूमामा यांच्याकडे पाहिले जाते. धनगर समाजाचे दैवत, अशी त्यांची ख्याती आहे. ज्या ठिकाणी बाळूमामा यांची मेंढरे जातात ती जागा रोग मुक्त आणि पवित्र होते अशी भक्तांची श्रध्दा आहे. हेरवाड परिसरात बाळूमामा यांची मेंढरे येताच तिथल्या नागरिकांनी त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या.  बोललेला नवस बाळूमामाची मेंढरे पुर्ण करतात, संकटे देखील दुर होतात अशी आस्था, असा विश्वास नागरिकांना असल्याने त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.  बाळूमामांची मेंढरे हेरवाड मध्ये तिन दिवस असणार आहेत, यानिमित्त माळ भागावरील ग्रामदैवत श्री संतुबाई देवीच्या मंदिरात दररोज सकाळी व सायंकाळी आरती, धनगरी ओव्या, भजन, किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी दिव...

हेरवाडमध्ये माजी सुभेदार लकाप्पा अकिवाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

इमेज
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी 75 व्या वर्धापन दिनानिमित्त हेरवाड सह परिसरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हेरवाड ग्रामपंचायतीने ध्वजारोहण करण्याचा मान गावातील माजी सुभेदार लकाप्पा अकिवाटे यांना देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सैनिक, सरपंच व पदाधिकारी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच गावतील पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धनंजय धोत्रे यांनी केले.  यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील, आर.बी. पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाज जमादार, माजी सुभेदार लकाप्पा अकिवाटे, सुवर्णा अपराज, ग्रामविकास अधिकारी पी. आर. कोळेकर, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव माळी, महावितरणचे अधिकारी सर्व सेवा संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, पदाधिकारी यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कौन बनेगा करोडपती शो मध्ये अकिवाट येथील शशांक चोथे यांचा सहभाग

इमेज
नामदेव निर्मळे / शिवार न्यूज नेटवर्क : अकिवाट तालुका शिरोळ, जिल्हा:- कोल्हापूर येथील शशांक चौथे हे खेडेगावातून पोहोचले कोण बनेगा करोडपती मध्ये महानायक अमिताभ बच्चन होस्ट करीत असलेल्या कौन बनेगा करोडपती सिझन 14 च्या शो मध्ये शशांक रामचंद्र चोथे सहभागी होत आहेत. शशांक चोथे हे अलिकडेच उरुण इस्लामपूर येथे शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. तसेच गेली कित्येक वर्षे ते खिद्रापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि पर्यटन विकासासाठी कार्य करीत आहेत. विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचे माजी विद्यार्थी असून त्यांनी महाविद्यालयाचे जीएस हे पद भूषविले होते. 15 आॅगस्ट पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव स्पेशल वीक मध्ये शशांक चोथे यांची अंतिम 10 कंटेस्टंट मध्ये निवड झाली. सोमवार 15 आॅगस्ट पासून सुरू होत असलेल्या आठवड्यामध्ये ते फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ट्रिपल टेस्ट खेळताना दिसतील.  देशभरातून लाखो स्पर्धक सहभागी होत असलेल्या या केबीसी शो साठी विविध पातळीवर अनेक चाचण्यांमधून सात राऊंड नंतर अंतिम फेरीकरिता निवड होत असते. कित्येक वर्षांच्या प्रयत्नानंतर देखील अंतिम...

गुरूंच्या आई वडिलांच्या हस्ते झाले अमृत महोत्सवी ध्वजारोहण 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

इमेज
  इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात सर्वत्र उत्साहात संपन्न होत आहे.आज स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजीअहिल्याबाई होळकर विद्यामंदिर क्रमांक 30 या शाळेतील शिक्षक श्री विजय काळे सर यांच्या आई वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.           यावर्षी ध्वजारोहणाचा सन्मान शाळेतील मुख्याध्यापकांचा असूनही मुख्याध्यापक श्री रणजीत पाटील सर यांनी आपल्या शाळेतील शिक्षक श्री. विजय काळे सर यांचे वडील श्री.अर्जुन परशराम काळे वय- 75 वर्षे व आई सौ.लक्ष्मीअर्जुन काळे वय -70  वर्षे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.      नगरपालिका शाळांच्या इतिहासात शिक्षकांच्या आई वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण होणे. ही एक सुखद घटना आहे. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.रणजीत पाटील सर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.*        याप्रसंगी या भागातील माजी नगरसेविका सौ.शुभांगी प्रधान माळी,सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रधान माळी,श्री. मारुती नाईक,श्री.आप्पासो नाईक,श्री.सचिन मासये,श्री. फारुख सय्यद...

बांबरवाडी,दत्तवाड शाळेत ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य श्री. बाबुराव पोवार यांचे हस्ते ध्वजारोहण

इमेज
दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क           विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड शाळेत ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य -श्री.बाबुराव पोवार यांचे शुभ हस्ते संपन्न झाले.              यावेळी चेअरमन पांडुरंग चव्हाण, मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे,दिलीपकुमार कुरुंदवाडे,नारायण पाटील,आनंदा पाटील,दत्ता राणे,बबन राणे,विकास भुत्तल,सचिन पाटील,नामदेव चव्हाण, पांडुरंग बापू चव्हाण, शिवाजी चव्हाण,रणजित चव्हाण,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता पाटील,सदस्या-अर्चना पाटील,कोमल चव्हाण, रेणुका पाटील, सविता मटाले,सीमा देसाई, सरिता राजमाने, रेखा चव्हाण उपस्थित होते.

कुमार, कन्या,उर्दू घोसरवाड शाळेत अमृतमहोत्सवी ध्वजारोहण उत्साहात साजरा

इमेज
घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क            अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त अतुल लिमिटेड पुणे यांचे मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी अतुल लिमिटेड पुणे यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.            याप्रसंगी कंपनीचे पदाधिकारी श्री.राहुल वाळवेकर,धनंजय गायकवाड,संतोष चौगुले तसेच दत्तवाड केंद्राचे केंद्रीय प्रमुख रमेश कोळी सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रामचंद्र नंदीकुरळे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. शितल सतिश चव्हाण,सदस्या सौ. वैशाली कुटवटे मॅडम,श्री.राजू ढोणे, मुख्याध्यापक -संजय निकम सर,अध्यापक -शामराव कांबळे,गुंडा परिट,दत्ता कचरे,अनिल मंगावे,दशरथ खोत,नंदकुमार पोवार, रामचंद्र खोत उपस्थित होते.

शंकरराव जाधव विद्या मंदिरमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

इमेज
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क : इचलकरंजी येथील शंकरराव जाधव विद्या मंदिरमध्ये ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष श्री महेंद्र बालर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .  या वेळी शाळेच्या मुलांनी देशभक्ती पर गाणी गायन केले. त्याच बरोबर मुलांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या विषयावर अत्यंत सुंदर भाषणे केली. तसेच या वेळी 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी शाळेतील मुलांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त पथनाट्य व लेझीम याचे उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण केले. .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वारे यांनी केले . पाहुण्याची ओळख शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शिवूडकर सर यांनी मानले.  यावेळी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे संचालक, संदीप सुतार, श्री ईश्वर सेवा मंडळाच्या संचालिका वर्षा गोरे (हाळवणकर ), शाळेच्या मुख्याध...

शिरोळ पंचायत समितीचे माजी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी -राजाराम काळगे यांचे दुःखद निधन

इमेज
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क             शिक्षण क्षेत्रातील एक खळखळते हसरे व्यक्तिमत्व अब्दुललाट नगरीचे सुपुत्र,शिरोळ पंचायत समितीचे सेवानिवृत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री.राजाराम दत्तात्रय काळगे यांचे वयाच्या 58 व्या वर्षी हृद्यविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. गेल्याच महिन्यात 31 जुलै 2022 रोजी 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले होते.अतिशय खडतर व हलाखीच्या परिस्थितीमधून शासकीय सेवेत प्रवेश केला होता.सांगली व कोल्हापूर जिल्हयात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला होता. धीरगंभीर प्रश्नांवर अगदी हसत खेळत चुटकीसरशी मार्ग काढण्यात त्यांचा हातखंडा होता.एखादया शाळेत भेटीसाठी गेल्यावर मुलांच्या बरोबर नाचत कविता,बडबडगीते स्वतः गात रममाण व्हायचे. नेहमी हसरा चेहऱ्याने सर्वांशी आपुलकीने वागणारे काळगे साहेब शिक्षणक्षेत्रात चिरंतन स्मरणात राहतील. अशा भावना समस्त शिक्षण वर्गातून भावना व्यक्त होत आहेत. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

74 बंधारे पाण्याखाली ; राधानगरी धरणातून 4456 क्युसेक विसर्ग

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.76 दलघमी पाणीसाठा आहे. सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 3 व 6 खुले असून सध्या धरणातून 4456 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव, तारळे व खडक कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व कुंभेवाडी, कडवी नदीवरील- सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे, कोपार्डे, भोसलेवाडी व वालुर, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, हिंडगांव व अडकूर, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची, मांगलेसावर्डे, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे व वाळवे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, को...

शिरोळमध्ये गुटख्यावर मोठी कारवाई ; १४ लाखाचा मुद्देमाल जप्त

इमेज
  शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : शिरोळ - नृसिंहवाडी मार्गावर वाहतूक होत असलेल्या बोलेरो पिकअप मधील गुटखा शिरोळ पोलिसांनी जप्त करून सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी तिघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिरोळ - नृसिंहवाडी मार्गावर असलेल्या दर्शन हॉटेल समोर करण्यात आली.  याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरोळ - नृसिंहवाडी मार्गावरून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती सर्व पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी बोलेरो पिकअप ही गाडी थांबवून गाडीतील सुमारे ७ लाख ५ हजार ६०० रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा तसेच सुमारे ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा दोन्ही मिळून १३ लाख ९३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अमर पाशा मिअर शेख (वय २८ ) व रफीक महंमद शेख ( वय : ३२) तसेच बंटी ( पूर्ण नाव समजू शकले नाही ) या तिघांच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप यांनी फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई सद...

पुराचा धोका कायम ; राधानगरीचे चार दरवाजे खुले

इमेज
  शिवार न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने पूरपरिस्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसापासून शहरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरु आहे. यामुळे धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा आज, पहाटे खुला झाला. एकूण सात दरवाज्या पैकी पहाटे 5:30 वाजता 6 नंबरचा दरवाजा खुला झाला. यानंतर सकाळी 8.55 वाजता गेट क्रमांक 5 खुले झाले. दुपारी 2:20 वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 उघडला. यानंतर दुपारी 3:20 वाजता चौथा दरवाजा उघडला. असे एकूण 3, 4, 5, 6 नंबरचे चार दरवाजे उघडले आहेत. या चार दरवाज्यातून 5712 क्युसेक तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक असा एकूण 7312 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहि...

73 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1600 क्युसेक विसर्ग

इमेज
  कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :  जिल्ह्यातील राधानगरी धरणात 225.58 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगाव, तारळे, खडक कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व कुंभेवाडी, कडवी नदीवरील- सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे, कोपार्डे, भोसलेवाडी व वालुर, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली, घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, हिंडगाव, बिजूरभोगोली व पिळणी, वारणा नदीवरील- मांगलेसावर्डे, चावरे, शिगांव, चिंचोली, कोडोली, तांदुळवाडी व खोची, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली व बाचणी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे, मांडुकली, असळज व सांगशी, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, तांम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व कोवाड, धामणी नदीवरील- सुळे, पणुंद्रे, आंबर्डे व गवशी, हि...

लायन्स क्लब मार्फत शाळेमध्ये इलेक्ट्रिकल साहित्य वाटप

इमेज
  इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क  लायन्स क्लबतर्फे जवाहर नगर येथील शंकरराव जाधव प्राथमिक विद्यामंदिर येथे हेल्दी स्कूल उपक्रमा अंतर्गत प्रत्येक वर्गामध्ये फॅन फिटिंग व ट्यूब लाईट फीटिंग करून देण्यात आले. सामान्य कामगार वस्तीतील शाळेची गरज ओळखून लायन्स क्लबने फॅन व ट्यूब लाईट फिटिंग करून देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली याबद्दल शिक्षक व पालक वर्गातून लायन्स क्लब चे कौतुक होत आहे. सदर या सेवा कार्यासाठी लायन सचिन येलाजा व लायन वर्षा येलाजा यांचे बहुमोल सहकार्य लाभले.  याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिव सुभाष तोष्णीवाल, खजिनदार संदीप सुतार, स्कूल कमिटी चेअरमन नंदकुमार बांगड, ला. अमित पोद्दार, ला.कृष्णा भराडीया , लेडीज कॉर्डिनेटर ला.कांता बालर, ला. रेणू बांगड आदी उपस्थित होते.

दत्तवाड येथे शाळेच्या लगतच बेकायदा मद्यविक्री जोमात

इमेज
  इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क दत्तवाड ( ता. शिरोळ) येथील कुमार व कन्या शाळेच्या लगतच चोरून देशी -विदेशी, गावठी हातभट्टी मद्याची बेकायदा विक्री करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यात धूळफेक करून हा गोरखधंदा जोमाने सुरू आहे. या ठिकाणी विनापरवाना चोरून मद्य विक्री होत आहे. अशा विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाने कंबर कसण्याची गरज आहे. बेकायदेशीर विनापरवाना मद्यविक्री च्या माध्यमातून त्यांनी चांगले जम बसवलेला आहे. कारवाई झाली तर पंटरला बकरा करून काही दिवसात पुन्हा त्याचा धंदा जोरात सुरू होतो. शाळेच्या आवारामध्ये मद्य विक्री करण्यास बंदी असताना सुद्धा शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून परवाना नसतानाही बिनधास्त दारू विक्री होत असल्याचे या ठिकाणी पहावयास मिळत आहे. या ठिकाणी असणाऱ्या अवैद्य मद्य विक्री च्या अड्ड्यामुळे येथील नागरिकांना मद्यपींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा हे विद्येचे माहेरघर असून शाळेच्या लगतच गावठी हातभट्टी दारू ची विक्री जोमात सुरू आहे. या अड्ड्यामुळे शाळेत शिकण्यास येणाऱ्या लहान मुलांवर वाईट परिणाम होण्याची शक्...

अबब... पोलिस नाईकने मागितली एक कोटीची लाच

इमेज
शिवार न्यूज नेटवर्क : शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल क्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल एक कोटी रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी पोलीस मुख्यालया कडील पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे याच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराचे देहुगाव ता. हवेली, जि. पुणे येथील शेत जमिनीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा सुरु आहे. याप्रकरणी जॉन तिवडे यानं तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून दाव्याचा निकाल प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी माने यांना सांगून तुमच्या बाजूने लावून देतो असे सांगत तुमच्या विरुध्द असलेली पार्टी एक कोटी देण्यास तयार आहे त्यामुळं केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून द्यायचा असेल तर तुम्ही किती रुपये देऊ शकता अशी विचारणा करत लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने लाचेच्या मागणीबाबत दि. २२ मार्च २०२२ रोजी शासकीय पंचासमवेत एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये पडताळणी केली. यावेळी पडताळणीत तिवडे याने लाच...

निपुण भारत अभियान अंतर्गत केंद्रस्तरीय उद्बोधन वर्ग दत्तवाड येथे संपन्न

इमेज
  दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क           निपुण भारत अभियान अंतर्गत दत्तवाड केंद्रस्तरीय उद्बोधन वर्ग श्रीमती आक्काताई नेजे हायस्कूल येथे संपन्न झाले. विद्या प्रवेश,निपुण भारत,नास इत्यादी विषयांवर श्री. शरद अवघडी,श्री.पारिसा पाटील,सौ.अर्चना पाटील या मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन झाले.केंद्रीय प्रमुख श्री.रमेश कोळी व केंद्र समन्वयक श्री.सुभाष कुरुंदवाडे यांचेही मार्गदर्शन झाले. दत्तवाड केंद्रातील मुख्याध्यापक, इ. १ ली ते ५वी मधील सर्व अध्यापक, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

जि.प. व पं.स.ची निवडणूक प्रक्रिया स्थगित ; या जिल्ह्यांचा समावेश

इमेज
  शिवार न्यूज नेटवर्क : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला असून, सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना; तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्‍य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे. या जिल्ह्यांचा समावेश रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीमधील जिल्हा परिषद आणि पंचाय...

विद्या धनवडे यांचे निधन

इमेज
निमशिरगांव : येथिल विद्या राजेंद्र धनवडे (वय - ४५ ) यांचे मंगळवार दिनांक २ ऑगस्ट रोजी अल्पशाहा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने निमशिरगाव गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती, भाऊ, एक मुलगा सुन व नातवंडे, असा मोठा परिवार आहे.