अरिहंत संस्थेचे ११०० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण : संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : पंचक्रोशीतील सहकार क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देऊन नफा कमविण्याचा उद्दिष्ट बाजूला ठेवून अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था कार्यरत आहे. संस्थेत ११०० कोटी इतक्या ठेवी असून उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ९३८ कोटी इतके कर्ज वाटप करून आर्थिक वर्षात ९ कोटी ७२लाख ९३ हजार रुपयांचे निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक, सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांनी बोरगाव येथे आयोजित बैठकीत दिली. रावसाहेब पाटील म्हणाले, सभासद ,ठेवीदार, कर्जदार,ग्राहकांचे सहकार्य व विश्वासामुळे आर्थिक टंचाईच्या काळातही घोडदौड सुरू ठेवली आहे. मध्यंतरीच्या कठीण परिस्थितीतही संस्थेने आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत नेला आहे. संस्थेत एकूण सभासद १३८७०,भाग भांडवल ५ कोटी ९१ लाख, गुंतवणूक १७९ कोटी, ठेवी ११०४ कोटी, कर्ज ९३८ कोटी, वार्षिक उलाढाल ९ हजार ५२ कोटी असून ९ कोटी ७२ लाख झाला आहे. सभासद व शेतकऱ्यांच्या कल्याण करिता विविध कर्ज योजना ,ठेव योजना हाती घेऊन गरजवंतांना वेळेत कर्ज पुरवठा केल्याने संस्थेचे ऑडिट वर्ग 'अ' मिळालेला आहे.संस्था प्र...